Monday, February 15, 2016

ट्रायव्हीट्रॉन समूहातर्फे ‘‘मेक इन इंडिया’’ मोहिमेअंतर्गत ट्रायव्हीट्रॉन मेडिकल टेक्नोलॉजी पार्क, चेन्नई येथे लॅबसिस्टीम डायग्नोस्टीक आयव्हीडी फॅक्टरी स्थापनभारतात प्रथमच जैवरसायनशास्त्र / रक्त गुणधर्म तपासणी / विवक्षित देखभाल निदान सुविधा / प्रतिकारशक्ती पडताळणी पंक्तीमित निदान संच आणि गुणवत्ता नियंत्रण सुविधा

५०० हून अधिक कर्मचारी नेमण्याची क्षमता

भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी व फिनलंडचे पंतप्रधान श्री. जुहा सिपिला यांनी १३ फेब्रुवारी, २०१६ रोजी इलेक्ट्रोनिक पद्धतीने मुंबईमधून मेक इन इंडिया परिषदेत उद्घाटन केले.

राष्‍ट्रीय, १३ फेब्रुवारी २०१६: ट्रायव्हीट्रॉन समूह या भारतीय वंशाची सर्वात मोठी वैद्यकीय उपकरण निर्माती कंपनी असलेल्या आणि आठ अद्ययावत उत्पादन प्रकल्प कार्यरत असणा-या कंपनीने मेक इन इंडिया उपक्रमाल प्रतिसाद म्हणून लॅबसिस्टीम डायग्नोस्टीक आयव्हीडी फॅक्टरी स्थापन केली आहे. भारत आणि फिनलंड यांचा संयुक्त उपक्रम (इंडो-फिनिश कोलाबरेशन) असलेला हा कारखाना चेन्नईमधील सिपकोट इंडस्ट्रीयल इस्टेट येथे २५ एकर परिसरात स्थित ट्रायव्हीट्रॉन मेडिकल टेक्नोलॉजी पार्क येथे स्थापन करण्यात आला आहे. वैद्यकीय उपकरणे आणि यंत्रणा निर्माण करण्याची सुविधा असलेले बहुविध कारखाने एकाच छताखाली सामावून घेण्याची क्षमता येथे उपलब्ध आहे. या लॅबसिस्टीम डायग्नोस्टीक आयव्हीडी फॅक्टरीचे उद्घाटन मुंबईमधून मेक इन इंडिया परिषदेत भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी व फिनलंडचे पंतप्रधान श्री. जुहा सिपिला आणि ट्रायव्हीट्रॉन ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्री. जीएसके वेलू यांनी १३ फेब्रुवारी २०१६ रोजी इलेक्ट्रोनिक पद्धतीने केले.

या प्रसंगी बोलताना, ट्रायव्हीट्रॉन ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्री. जीएसके वेलू म्हणाले, ‘‘लॅबसिस्टीम ओवाय फिनलंड यांच्या फिनिश आयव्हीडी तंत्रज्ञानावर उभारलेल्या आमच्या नव्या अद्ययावत उत्पादन प्रकल्पाची घोषणा करण्यासाठी आज आम्हाला भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी व फिनलंडचे पंतप्रधान श्री. जुहा सिपिला लाभले हे आमचे मोठे सुदैव आहे. आमच्या माननीय पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या मेक इन इंडिया मोहिमेचा वैद्यकीय उपकरण उद्योग हा एक सर्वात मोठा लाभार्थी असून या उद्योगाला सुमारे ८५% आयातीवर अवलंबून लागत असल्याने त्यामधून त्याला बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने हाती घेतलेल्या अन्य काही उपक्रमांचाही मोलाचा हातभार लागणार आहे. पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया उपक्रमाचा मी निस्सीम पुरस्कर्ता असून फिनिश पंतप्रधानांच्या समवेत आमच्या या नव्या प्रकल्पाच्या अनावरण समारंभाला आपले आशीर्वाद देऊन वैद्यकीय उपकरण क्षेत्राला मेक इन इंडिया उपक्रमात प्रोत्साहन दिल्याबद्दल आम्ही आमच्या पंतप्रधानांचे ऋणी आहोत. संशोधन आणि विकास कामात अधिकाधिक गुंतवणूक करण्यासाठी तसेच सहयोगी उत्पादन उपक्रमांना भारतात रुजण्यासाठी हे एक मोठे प्रोत्साहन आहे असे आम्ही मानतो.’’

अद्ययावत तंत्रज्ञान हस्तगत करून समाजातील मोठ्यातमोठ्या लोकसंख्येला ते उपलब्ध व्हावे या मिषाने ट्रायव्हीट्रॉनने वैद्यकीय उपकरणांची नामांकित निर्माती कंपनी असलेल्या लॅबसिस्टीम डायग्नोस्टीक ओवाय कंपनीचे अधिग्रहण केले आहे. नवजात शिशूंचे निदान तंत्रज्ञान क्षेत्रातील लॅबसिस्टीम डायग्नोस्टीक ओवाय ही जगातील दुस-या क्रमांकाची असून प्रयोगशाळा औषधांच्या क्षेत्रातील विविध उत्पादने तयार करण्यात या कंपनीची अव्व्लता आहे. या कंपनीने आपल्या फिनिश कंपनीकडून तंत्रज्ञान हस्तांतर साध्य केले असून जैवरसायनशास्त्र / रक्त गुणधर्म तपासणी / विवक्षित देखभाल निदान सुविधा / प्रतिकारशक्ती पडताळणी पंक्तीमित निदान संच आणि गुणवत्ता नियंत्रण सुविधा यासाठी ट्रायव्हीट्रॉन मेडिकल टेक्नोलॉजी पार्क येथे नवी अद्ययावत सुविधा स्थापित केली आहे. हा तिसरा उत्पादन प्रकल्प असून त्याचे व्यावसायिक उत्पादन लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे. या पार्कमधून भारतात प्रथमच देशव्यापी पातळीवर वापरण्यासाठी नवजात शिशू स्क्रीनिंग यंत्रणा निर्माण केली जाईल आणि हळूहळू पण निश्चितपणे भारतातील २७ दशलक्ष नवजात अर्भकांना परवडणा-या खर्चात ती उपलब्‍ध करून दिली जाईल. नवजात शिशू स्क्रीनिंग संचाखेरीज या प्रकल्पातून पंक्तीमित निदान /आण्विक निदान/ नव्या पिढीचे विवक्षित निदान तंत्र यांच्यावर आधारित उच्च तंत्रज्ञानाचे निदान संच देखील निर्माण करण्यात येणार आहेत. दक्षिण आशिया प्रांतात प्रथमच अशा संचाची निर्मिती होणार आहे. महिला आणि बालरोग क्षेत्रात तसेच संसर्गजन्य विकार निदान क्षेत्रातील विविध आजार आणि कमतरता यांच्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. या नव्या उत्पादन प्रकल्पात ५०० हून अधिक कर्मचारी नेमण्याची क्षमता आहे.

भारत आणि युरोपात मिळून ८ उत्पादन प्रकल्प असलेल्या ट्रायव्हीट्रॉन समूहाची कर्मचारी क्षमता १,५०० हून अधिक असून समूहाचे उत्पन्न ७०० कोटी रुपयांहून अधिक आहे. वैद्यकीय उपकरण क्षेत्रात समूहाने ५०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केलेली आहे. कंपनीने आयातीला पर्याय म्हणून गेल्या दोन वर्षात हाती घेतलेल्या अन्य उपक्रमांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो – ‘‘हिताची अलोका सहयोग कराराद्वारे भारतात अल्ट्रासाऊंड ट्रांसड्यूसर्सचे उत्पादन करणारी एकमेव कंपनी’’, ‘‘किरण आयएमडी सहयोग कराराद्वारे अद्ययावत मोनोब्लॉक आणि क्ष-किरण जनरेटर तंत्रज्ञान निर्मिती करणारी पहिली कंपनी’’आणि आयात पर्याय उपक्रम म्हणून इमेजिंग/निदान/अतिदक्षता आणि ऑपरेशन थिएटर क्षेत्रात अनेकविध उप्रकम यामुळे ‘‘मेक इन इंडिया धोरणा’’अंतर्गत भारताला सध्याच्या ८५% आयात निर्भरतेमधून बाहेर पडता येणार आहे. ट्रायव्हीट्रॉन हेल्थकेअर आरोग्य मंत्रालय, जैव तंत्रज्ञान खते, औद्योगिक प्रसार आणि धोरण विभाग आणि औषधनिर्माण खाते यांच्या सहयोगाने कार्यरत असून त्यांच्या स्वतःच्या अथवा अन्य संघटनांच्या मार्फत स्थानिक संशोधन  विकास कार्य आणि मेक इन इंडिया उपक्रम वैद्यकीय उपकरण क्षेत्रासाठी लागू करण्यासाठी आवश्यक धोरण आराखडा ठरविण्याचे काम केले जात आहे. समस्त वैद्यकीय उपकरण क्षेत्र त्यांना एक स्वायत्त विभाग म्हणून गणल्याबद्दल माननीय पंतप्रधान यांचे ऋणी असून वैद्यकीय उपकरण क्षेत्रामधे १००% परकी थेट गुंतवणूक, कच्च्या मालावर/सुट्या भागांवर आयात शुल्कात सवलत आदी नव्या उपयोजनाचे स्वागत करत आहे.

ट्रायव्हीट्रॉन हेल्थकेअर विषयी:

ट्रायव्हीट्रॉन हेल्थकेअर प्रायव्‍हेट लिमिटेडला १९९७ मध्ये प्रारंभ झाला, जेव्हा डॉ. वेलू या पहिल्या पिढीच्या उद्योजकांनी समाजातील दुर्लक्षित घटकांना परवडणा-या किंमतीतील वैद्यकीय तंत्रज्ञान उपयोजन आणि सेवा पुरविण्यासाठी एक कंपनी उभारण्याचे ठरविले. आज ट्रायव्हीट्रॉन हेल्थकेअरने स्थानिक आणि जागतिक संस्थांच्या यशस्वी सहयोगाने ७०० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्नाचा टप्पा साध्य केला असून १६५ हून अधिक देशांत उत्पादने निर्यात करणारी ती भारतीय वंशाची सर्वात मोठी वैद्यकीय तंत्रज्ञान कंपनी बनली आहे.

No comments:

Post a Comment