Friday, January 8, 2016

‘पोलिस लाईन’ म्युझिक लाँच सोहळा संपन्न
आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अनेक घटनांचे प्रतिबिंब चित्रपटाच्या माध्यमातून उमटत असते. समाजाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या ‘पोलिस’ या महत्त्वपूर्ण घटकाची कथा आता मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातली आहे. नाण्याच्या एकाच बाजूचा विचार आपण अनेकदा करत असतो दुसरी बाजू तशीच अंधारात रहाते. या अंधारात राहिलेल्या बाजूवर प्रकाश टाकण्याचं काम दिग्दर्शक राजू पार्सेकर यांनी आपल्या आगामी पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्य या चित्रपटातून केलं आहे.  साईश्री क्रिएशन प्रस्तुत जिजाऊ क्रिएशन निर्मित या मराठी चित्रपटातून पोलिसांची एक वेगळी बाजू मांडण्यात आली आहे.

नुकतंच या सिनेमाचं म्युझिक लाँन्च डॉ. पी.एस.कृष्णमुर्ती यांच्या हस्ते संपन्न झालं. सिनेमाचा ट्रेलरसुध्दा यावेळी दाखवण्यात आला. ज्येष्ठ गायक अनुप जलोटा यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते"सदरक्षणाय खलनिग्रणाय” आणि आख्खा शिनेमा पाहून घे’’ ही दोन गीते या चित्रपटात आहेत. ही गीते कौतुक शिरोडकरनितीन तेंडुलकर यांनी शब्दबद्ध केली असून प्रविण कुवरअभिषेक शिंदे यांचा संगीतसाज गीतांना लाभला आहे. आदर्श शिंदेभारती मढवीप्रविण कुवर यांनी ही गीते स्वरबद्ध केली असून प्रविण कुवरओंकार टिकले यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे.नृत्यदिग्दर्शन संतोष पालवणकर यांचं आहे. यातल्या आख्खा शिनेमा पाहून घे’’ हे गीत मानसी नाईकवर चित्रित करण्यात आलं आहे.

सामान्यांच्या सेवेला कायम तत्पर असणाऱ्या पोलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वतःच्या ही काही गरजा आहेत. अहोरात्र सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या पोलिसांच्या या गरजांचा विचार व्हावा यासाठी पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्य या चित्रपटाची निर्मिती जिजाऊ क्रिएशनतर्फे करण्यात आली. रंजनातून अंजनाची जाणीव करून देणारा हा सिनेमा २९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सतत ऑन ड्यूटी’ असल्याने ढासळते आरोग्यतणावनिवासस्थानाची दुर्दशातुटपुंजा पगार अशा अनेक समस्यांमुळे पोलिस त्रस्त आहेत. पोलिसांना भेडसावणाऱ्या या समस्यांवर पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्यया चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. हा चित्रपट सर्वसामान्यांना पोलिसांच्या वेदनेची नक्कीच जाणीव करून देईल.

श्रीधर चारीभारती शेट्टी व निक्षाबेन मोदी या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. रुपाली पवार व वैशाली पवार या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. चित्रपटाची कथा दिपक पवार यांची असून पटकथासंवाद अमर पारखेराजू पार्सेकरसंदेश लोकेगांवकर यांचे आहेत. दिग्दर्शन राजू पार्सेकर यांचे आहे. सतीश पाटील यांनी संकलनाची व निलेश ढमाले यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे.

जयंत सावरकरसतीश पुळेकरप्रदीप पटवर्धनविजय कदमप्रदीप कबरेप्रमोद पवारजयवंत वाडकर,संतोष जुवेकरमानसी नाईक,निशा परुळेकरपूर्णिमाअहिरे-केंडनूतन जयंतप्रणव रावराणेसतीश सलागरेजयवंत पाटेकरस्वप्नील राजशेखरशर्मिला बाविस्करमनोज टाकणेबालकृष्ण शिंदेअतुल सणसरियाज मुलाणीसंदेश लोकेगांवकरशितल कलापुरेअश्विनी सुरपूरलीना पालेकरआरती कुलकर्णीदिनेश मोरेउमेश बोळकेपार्थ घोरपडेयुवराज मोरेनवतारका सायली संजीवया कलाकारांच्या भूमिका यात आहेत. २९ जानेवारीला पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्य हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

No comments:

Post a Comment