आशय-विषयांचे वैविध्य हामराठी चित्रपटांचा 'यूएसपी' आहे. मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर डंका वाजवल्यानंतर अधिकाधिक अमराठी निर्माते मराठी सिनेमाकडे वळले.इतकेच नाहीतर परदेशात स्थायिक असलेल्या निर्मात्यांनीही मराठी सिनेमा बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हॉलीवूडच्या 'इस्ट वेस्ट फिल्म्स' या नामांकित कंपनीनेस ‘परतु’च्या माध्यमातून एक चांगली कलाकृती रसिकांसाठी आणली आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा सहवासाच्या, अनुभूतीच्या नात्याचे बंध अधिक बळकट असतात अशाचं जपलेल्या अनोख्या बंधाची वभावभावनांची हृदयस्पर्शीसत्य घटनेवर आधारीत मनाला स्पर्शून जाणारी कथा‘परतु’ सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.
अमेरिका असो की भारत किंवा अन्य कुठला देश असो, सर्वत्र मानवी भावभावना, आपले कुटुंब, आपली माणसं यांच्याविषयीची ओढ सारखीच असते. कळत नकळत माणुसकीचे आणि नात्यांचे जे अनुबंध निर्माण होतात. त्या अनुबंधाचा वेध निर्माते-दिग्दर्शक आणि या चित्रपटाचे कथालेखक नितीन अडसूळ यांनी ‘परतु’ चित्रपटातून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एका मुलाची कथा यात रेखाटण्यात आली आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाचे कथानक, कलावंत आपल्या मातीतले परंतु चित्रपटाची निर्मितीमूल्ये, नियोजन व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यात आली आहेत.
‘परतु’ चित्रपटात १९६८ ते १९८५ दरम्यानचा काळ रेखाटण्यात आला असून प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचा कथाविषय या निमित्ताने पहाता येणार आहे. महाराष्ट्र व राजस्थान दोन राज्यात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मराठी सिनेमा बऱ्याचदा स्टुडीओमध्ये चित्रीत केला जातो, पण ‘परतु’ सिनेमासाठी कथानकाचा विचार करून,आव्हानात्मक लोकेशनवर वास्तवदर्शी चित्रीकरण करण्यात आले आहे. यासाठी राजस्थानमधील जोधपूर शहरात ६८ किमी. आत वाळवंटात चित्रीकरण करण्यात आलंय हे विशेष. चित्रपट पाहताना लोकेशनमधील वैविध्य आणि भव्यता प्रेक्षकांना नक्कीच सुखावणारी ठरणार आहे.
संजय खानझोडे यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले असून संकलनप्रसिद्ध संकलक राजेश राव यांनी केले आहे. संगीतकार शशांक पोवार यांनी चित्रपटाला साजेशी संगीताची साथ दिली आहे तर सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी' चित्रपटाचे थीम सॉंग गायले आहे तसेच ग्रेग सिम्स या हॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीत संयोजकाने चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे.
या चित्रपटाची कथा क्लार्क मॅकमिलिअन, नितीन अडसूळ व डेरेल कॉक्स यांनी लिहिली असून याचे मराठी संवाद लेखन मयुर देवल यांनी केलं आहे. चित्रपटाचे निर्माते म्हणून नितीन अडसूळ, सचिन अडसूळ, रुपेश महाजन, डेरेल कॉक्स, क्लार्क मॅकमिलिअन हे काम पहात आहेत. किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले, गायत्री देशमुख, अंशुमन विचारे,नवनी परिहार, राजा बुंदेला रवी भारतीय आणि बालकलाकार यश पांडे अशा दिग्गज कलाकारांच्या ‘परतु’ सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या ४ डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
No comments:
Post a Comment