Saturday, September 19, 2015

उळागड्डी चित्रपटाचा मुहूर्त


गेल्या काही वर्षापासून आशय-विषयाच्या वेगळेपणामुळे मराठी सिनेमा सातत्याने गाजतो आहे. मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. कलात्मक तरीही व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती करणारी दिग्दर्शकांची नवीन फळी मराठी चित्रपटसृष्टीत आश्वासकपणे कार्यरत आहे. याच फळीतलं एक आश्वासक नाव म्हणजे अभिजीत पानसे.  

मनोरंजनाला कलात्मकतेची जोड देऊन दर्जेदार सिनेमा करण्याचं शिवधनुष्य पेलत अभिजीत पानसे उळागड्डीहा वेगळ्या धाटणीचा सिनेमा घेऊन येत आहेत. रेगे’ चित्रपटाच्या यशानंतर अभिजीत पानसे यांच्या ‘उळागड्डी’या दुसऱ्या चित्रपटाची खासियत काय असणार? याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे.
या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मा.राज ठाकरे यांच्या हस्ते दादासाहेब फाळके चित्रनगरीत संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील कलाकार तंत्रज्ञांसह चित्रपटाला शुभेच्छा देण्यासठी अभिनेता महेश मांजरेकर, मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर,शालिनी ठाकरे, अभिनेता जयवंत वाडकर आवर्जून उपस्थित होते.
एऑन पिक्चर्स प्रा.लि. प्रस्तुत, द आर्ट बिट इनोव्हेशन प्रा.लि. निर्मित ‘उळागड्डी’ या चित्रपटात पठडीबाहेरील विषय हाताळण्यात आला असून, सिनेजगतातील अनेक प्रतिथयश नावं या चित्रपटाशी जोडली गेली आहेत. ज्यात ‘दशावतारम’, ‘रामलीला’, ‘बर्फी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे ख्यातनाम कॅमेरामन रवी वर्मन, ‘यारीयां’, ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या कलादिग्दर्शिका सलोनी धात्रक आणि व्हिजुअल इफेक्ट्स व टेक्निकल दिग्दर्शक प्रसाद सुतार यांचा समावेश आहे.

शिल्पा राऊत, संदीप राऊत व अभिजीत पानसे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा शिवराज वायचळ यांची असून संवाद शिवराज वायचळ व अभिजीत पानसे यांचे आहेत. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते रत्नकांत जगताप आहेत.

भाषेच्या मर्यादा ओलांडून केवळ कलासंपन्न कलाकृतीकरिता ही दिग्गजमंडळी एकत्र आली आहेत.चित्रीकरणाआधीच तेलगु, हिंदी आणि फ्रेंच इंडस्ट्रीत चर्चिला जाणारा ‘उळागड्डी’ हा बहुधा पहिलाच चित्रपट आहे.सशक्त संहिता आणि तितकेच दमदार सादरीकरण यातून उत्तम निर्मितीच्या ध्यासाने दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी चाकोरीबाहेरचा उळागड्डी हा चित्रपट रसिकांसाठी आणला आहे. ‘लाईफ ऑफ पाय’  सारख्या उच्च दर्जाच्यातंत्राचा वापर या चित्रपटात करण्यात येणार आहे.

विस्तारत चाललेल्या मराठी सिनेमाच्या कॅनव्हासवरती उळागड्डी हा सिनेमा यशाचा नवीन मापदंड निर्माण करेल अशी आशा करता येईल.

No comments:

Post a Comment