Saturday, July 11, 2015

मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘मर्डर मेस्त्री’ चित्रपटाचा भव्य प्रीमिअर


शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या मल्टीस्टारर मर्डर मेस्त्री चित्रपटाचा भव्य प्रीमिअर सोहळा गुरुवारी मुंबईतील कार्निवल सिनेमाज् मध्ये धडाक्यात संपन्न झाला. या प्रीमिअरला सिनेमातील स्टारकास्टसह एन चंद्रा, पुरुषोत्तम बेर्डेअनंत जोग, महेश कोठारेजयवंत वाडकर,  विजय पाटकरपुष्कर श्रोत्री, सुबोध भावे, समीर पाटील, आदिनाथ कोठारे, अभिजित खांडकेकर,  दिपाली सय्यद उर्मिला कानेटकरस्पृहा जोशी यांच्यासह मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. उपस्थित मान्यवरांनी चित्रपटातील कलाकारांचे आणि निर्माते-दिग्दर्शकांचे मनापासून कौतुक केले.

‘मर्डर मेस्त्री’ हा सस्पेन्स कॉमेडी चित्रपट आहे. नाडियादवाला जेननेक्स्ट प्रोडक्शन्स आणि व्हीटीबी एन्टरप्राईझेस यांची संयुक्त निर्मिती असलेला 'मर्डर मेस्त्रीहा सिनेमा निर्माते अब्रार नाडियादवाला यांचा पहिलाच मराठी सिनेमा आहे. दिलीप प्रभावळकरवंदना गुप्ते या दोन मात्तबर कलाकारांसोबत हृषिकेश जोशीविकास कदमसंजय खापरेकमलाकर सातपुतेदेवेंद्र भगतक्रांती रेडकरमानसी नाईक या नव्या दमाच्या कलाकारांची फळी या चित्रपटात आहे.

No comments:

Post a Comment