Friday, May 29, 2015

‘जीत’ चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न
प्रेक्षकांच्या जाणिवा व समाजभान जागृत करणारा जीत या आशयघन मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच फिल्मसिटीत कलाकारांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. चित्रपटातील एका युथफुल गाण्याचे चित्रीकरण यावेळी करण्यात आले. हे युथफूल गाणं संजय राऊत यांनी लिहिलं असून याचं धमाकेदार संगीत अमित राज याचं आहे. सद्यस्थितीतील स्पर्धात्मक परिस्थिती व त्याच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा वेध घेणारा ‘जीत’ हा सिनेमा वेगळे विचार मांडतो.

मंजुश्री गोखले यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून पटकथा मंजुश्री गोखले व सागर चव्हाण यांची आहे. प्रीतपाल सिंग शेरगीलराजेश आर कुमार निर्मित व सागर चव्हाण दिग्दर्शितजीत या सिनेमात सयाजी शिंदेभूषण प्रधानत्रिशला शहाशरद पोंक्षे, मनोज जोशीविलास उजवणे,सचिन दनाईअंजली उजवणेवरुण गुलाटी या कलाकारांच्या भूमिका आहेत.

चित्रपटाचे सुरेख छायांकन मनोज शॅा यांनी केल असूनरामेश्वर भगत यांचं संकलन आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी शैलेश महाडिक यांनी सांभाळली आहे. हिंदीतले प्रथितयश नृत्यदिग्दर्शक चिन्नी प्रकाश बऱ्याच वर्षाने या चित्रपटातून नृत्यदिग्दर्शनासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. चिन्नी प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सभी को चाहिये जिंदगी में जीत...’ या गीतावर जीत चित्रपटातील कलाकार थिरकणार आहेत. 

वाइल्ड रोझ फिल्म या बॅनरखाली तयार झालेला हा सिनेमा समाजातील ढोंगीपणाहतबलता,क्रौर्य आणि सिस्टीमची उदासीनता याकडे लक्ष वेधतो. 'पैसा आणि सत्ता यांच्या बळावर काहीही करू शकतो अशी धारणा सध्या समाजात रुढ होऊ पाहत आहे याला छेद देण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे. हेच दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक सागर चव्हाण यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment