‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ डॉक्युमेंट्रीची निर्मिती
कोणताही हाडाचा कलाकार आपल्या मातीतील चित्रपटसृष्टीपासून कितीही दूर गेला तरी कलेपासून मात्र दूर राहू शकत नाही. याचा प्रत्यय भारतीय सिनेसृष्टीत मानाचं स्थान असणाऱ्या अभिनेत्री अश्विनी भावेंकडे पाहिल्यावर येतो. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्याअश्विनी आजही भारतीयसृष्टीत मोलाचं योगदान देत आहेत. अमेरिकेहून येऊन ‘कदाचित’ सारख्या चित्रपटाची निर्मिती करणं असो, ‘आता होऊन जाऊ दया’ सारख्या रिअॅलिटी शो मध्ये परिक्षकाच्या रुपात स्पर्धकांच्या कलागुणांचं मूल्यमापन करणं असो किंवा ‘आजचा दिवस माझा’ सारखा सिनेमा असो. प्रत्येकवेळी अश्विनी भावे यांनी प्रवाहापेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचं कौतुकच झालं आहे. ग्रेट मराठा प्रॅाडक्शनच्या आगामी सिनेमातही अश्विनी अत्यंत वेगळ्या भूमिकेत समोर येणार आहेत.
अभिनयाप्रमाणे लेखनशैलीतहीअश्विनी भावे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.१९९८ मध्ये त्याचं ‘मनोभावे’ हे पुस्तक प्रकाशित झालं. आदिवासींची वारली कला आणि जीवनावर आधारित ‘वारली आर्ट अॅण्डकल्चर’ नावाची डॉक्युमेंट्री अश्विनी यांनी २००२ साली बनवली. मामि फिल्म फेस्टीव्हमध्ये प्रदर्शित झालेल्या याडॉक्युमेंट्रीची निर्मिती लेखन आणि दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी अश्विनी यांनी यशस्वीरीत्या सांभाळली होती. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने त्या कायम कलाक्षेत्राशी जोडलेल्या राहिल्या.आता त्यांनी एक नवं पाऊल उचललं आहे. मानवी जीवाशी खेळणाऱ्यांचा पर्दाफाश करणाऱ्या‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’नावाच्याडॉक्युमेंट्रीच्या निर्मितीत त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ ही डॉक्युमेंट्री सध्या जागतिक पातळीवर सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.अश्विनी भावे याडॉक्युमेंट्रीच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाच्या समजल्यासर्वच सिनेमहोत्सवांमध्ये ‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ने आपला ठसा उमटवला आहे. टॅाकसीक केमिकल्स आज मानवाच्या जीवाला किती हानिकारक आहे याबाबतची माहिती ‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ मध्ये देण्यात आली आहे. कॉफी, टूथपेस्ट, क्रीम, लिपस्टिक यांसारख्या दैनंदिन जीवनातील उपयोगाच्या वस्तूंद्वारे केला जाणारा केमिकल्सचा मारा मानवी जीवनाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहे. स्लो पॅायझन सारखा परिणाम करणारी ही केमिकल्स ब्रेस्ट कॅन्सर, इनफर्टीलिटी (छातीचा कर्करोग, गतिमंदत्व, व्यंधत्व) यासारख्या रोगांना आमंत्रण देत आहेत. असं असताना मोठी कॅार्पोरेट्स आणि बडे राजकारणी याकडे हेतू पुरस्सर डोळेझाकपणा करत आहेत. काही जण याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असले तरी तो पुरेसा नाही. याबाबत जनतेमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने ‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ ही डॉक्युमेंट्री समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.
‘केटीएफ फिल्म्स’ ची प्रस्तुती असलेल्या‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’चं दिग्दर्शन एमीअॅवॅार्ड विजेते पत्रकार डाना नाकमन आणि डॉन हर्डी यांनी केलं आहे. ऑस्कर विजेते अभिनेते शॅान पेन या चित्रपटाचे सूत्रधार आहेत.डाना नाकमन यांनी लिहलेल्या याडॉक्युमेंट्रीला स्कॅाट हार्डकिस यांनी संगीत दिलं आहे. ‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ ही डॉक्युमेंट्री जगाला संदेश देणारी असून मानवी हिताची आहे. जागतिक केमिकल इंडस्ट्रीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्याचं काम करणाऱ्या ‘द ह्युमनएक्सपेरीमेंट’वर जगभरातील समीक्षकांनी स्तुतीसुमनांची उधळण केली आहे. काही व्यक्तींच्या कथांच्या तसेच आंदोलकांनी केलेल्या आंदोलनाच्या आधारे केमिकल इंडस्ट्रीच्या कार्यशैलीचं सत्य अधोरेखित करण्यात आलं आहे.
युनायटेड स्टेट्स मध्ये ८० हजारपेक्षा जास्तकेमिकल्स उपलब्ध आहेत यापैकी केवळ२० केमिकल्सची तपासणी करण्यात आली आहे. त्यातीलपाच केमिकल्सना इपीएची मान्यता आहे. हे सत्य ‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ मध्ये दाखवण्यात आलं आहे. डाऊ, ड्यूपॅान्ट एक्सऑनमोबील यांसारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांचा उल्लेखही यात आहे. अशा प्रकारे मानवी हिताचं काम करणाऱ्या डॉक्युमेंट्रीशीअश्विनी भावे हे एकमेव भारतीय नाव जोडलं जाणं, हे भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
नुकतीच ‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ ही डॉक्युमेंट्री युएसमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाली. ‘अर्थ डे’च्या मुहूर्तावर हीडॉक्युमेंट्री आयट्युन्स तसेच अॅमेझॅानसारख्या जागतिक दर्जाच्या डिजीटल व्यासपीठावरही प्रदर्शित होईल.
No comments:
Post a Comment