Thursday, May 21, 2015

नांदी नाटकाचा 'वर्ल्ड थिएटर टेलिव्हिजन प्रिमिअर' स्टार प्रवाह वाहिनीवर

C:\Users\chavand1\AppData\Local\Microsoft\Windows\Temporary Internet Files\Content.Word\Nandee Endpage.png
नांदी नाटकाचा 'वर्ल्ड थिएटर टेलिव्हिजन प्रिमिअर' स्टार प्रवाह वाहिनीवर
३० मे २०१५ रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता
मुंबई, १९ मे २०१५ : स्टार प्रवाह वाहिनी आपल्या प्रेक्षकांना विविध  प्रकारचे दर्जेदार मनोरंजन देण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे. आणि आता खास मराठी नाट्यरसिकांसाठी स्टार प्रवाह वाहिनी 'वर्ल्ड थिएटर टेलिव्हिजन  प्रिमिअरचा' नजराणा घेऊन येत  आहे. या उपक्रमाद्वारे मराठी रंगभूमीवर गाजलेल्या नाटकांचा आस्वाद  रसिक प्रेक्षकांना  आता घरबसल्या घेता येणार आहे. या उपक्रमाची नांदीच प्रेक्षक आणि समीक्षकांनी गौरविलेल्या 'नांदी ' या नाट्याविष्काराने   होत आहे. ३० मे २०१५ रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता या नाटकाची तिसरी घंटा स्टार प्रवाह वाहिनीवर वाजणार आहे.
मराठी रंगभूमीच्या दीडशे वर्षाच्या प्रवासात स्त्री-पुरुष नातेसंबंधावर भाष्य करणाऱ्या अनेक दर्जेदार कलाकृती सादर केल्या गेल्या. अगदी  'अभिज्ञान शाकुंतलम्'पासून ते अलीकडच्या  'चाहुल'पर्यंत अनेक नाटकांमध्ये हा विषय काळानुरूप हाताळला गेला आहे. या दीडशे वर्षात प्रत्येक दशकात अजरामर ठरलेल्या काही नाट्य कलाकृतींमधून प्रसंग घेऊन  त्याच्याभोवती आजच्या काळातील नाट्य रचले आहे. आणि यातूनच साकार झालेले एक सुंदर कोलाज म्हणजे ‘नांदी’ ! अशी  ही  सर्वांग सुंदर कलाकृती शंभराव्या प्रयोगानंतर रंगभूमीवरून निरोप घेत आहे परंतु स्टार प्रवाह 'वर्ल्ड थिएटर टेलिव्हिजन  प्रिमिअर'च्या माध्यमातून  छोट्या पडद्यावर एका नव्या पर्वाची नांदी करीत आहे.
या प्रसंगी बोलताना स्टार इंडियाचे प्रवक्ते म्हणाले की, " नांदी हा मराठी रंगभूमीवरचा एक ऐतिहासिक प्रयोग आहे.या नाट्यकृतीने मराठी रंगभूमीवर एक वेगळे स्थान निर्माण केले आहे .  या नाटकाचा प्रयोग बघण्याचा योग काही भाग्यवंतानाच मिळाला, म्हणुनच स्टार प्रवाहने पुढाकार घेऊन नाटकाचे चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. स्टार प्रवाह वाहिनीद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना या नाटकाचा आनंद घेता येणार आहे. स्टार प्रवाहच्या या उपक्रमामुळे हे नाटक आता अजरामर होणार आहे.”
हृषिकेश जोशी यांना मिळालेल्या  शिष्यवृत्ती अतंर्गत  'मराठी रंगभूमीवरील अभिनयाचा प्रवास' या विषयावर संशोधन करण्याचा योग आला . या संशोधनादरम्यान अनेक नाटकांचे वाचन करताना  रंगभूमीच्या इतिहासाच्या टप्प्याटप्प्यावर लिहिल्या गेलेल्या नाटकांत अनेक साम्यस्थळे आढळली. त्यातून या नाटकाची संकल्पना त्यांना सुचली. केवळ  विषयच नव्हे तर इतर अनेक वैशिष्ट्ये या नाटकाशी जोडलेली आहेत. या नाटकात १०  कलाकारांनी  केलेल्या २३  विविध भूमिका  हे आणखी एक  वैशिष्टय.  या नाटकात शरद पोंक्षे, अविनाश नारकर, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, हृषिकेश जोशी, अश्विनी एकबोटे, सीमा देशमुख, तेजस्विनी पंडित आणि स्पृहा जोशी या  दहा कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. मराठी रंगभूमीच्या गतवैभवाची साक्ष सांगणाऱ्या या नाटकात गाजलेल्या  भूमिका करणे, या कलाकारांसाठी मोठी पर्वणी होती. याच संधीचे सोने करीत या आघाडीच्या कलाकारांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून १०० यशस्वी  प्रयोगांची मोट बांधली. या आगळ्या वेगळ्या नाट्यकृतीच्या निर्मितीसाठी  दिलीप जाधव, प्रसाद कांबळी, चंदू लोकरे आणि संज्योत वैद्य या चार  निर्मात्यांनी मिळून मोलाचा वाटा उचलला.
पाहायला विसरू नका, 'वर्ल्ड थिएटर टेलिव्हिजन  प्रिमिअरचे’ पुष्प पहिले - ‘नांदी’
३० मे २०१५ रोजी संध्याकाळी  ठीक ७ वाजता
फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर

No comments:

Post a Comment