Sunday, April 12, 2015

Now the kids will say Aatli Batli Phutali








We have often heard the kids saying the line Aatali Batli Phutali but in reality it means Aatali batami Phutali. (The hidden news is now out). The line has been created by kids who cant pronounce the original sentence and most of us has said this line in our childhood days. In today's world the self-centered behavior is on the rise and the tendency to think about others and helping out others is declining rapidly. It is a known fact that whatever we teach the kids in the childhood shapes their personality when they grow up. Considering that to inculcate the feeling of cooperation in the kid in the tender age producer Supriya Chavan has produced the Marathi film Aatli Batli Phutali. The film which revolves around kids will be released on April 24th.

            The film is produced by Running Reel Productions. The tender and sensitive emotional world of the kids will be unfolded through the film. In this age of internet and Television, the kids have forgotten the true meaning and joy of friendship. The kids will get to experience the joy of true friendship through the film.


            Producer Supriya Chavan expressed the confidence that this film will prove to be a significant film from the children's point of view. The audience will get to watch the natural acting of the child actors in the film which is directed by Amol Padave. The cast includes child actors Sharau Sonavane, Viraj Rane, Aditya Kawale, Anay Patil, Shreyali Vahane, Purva Shah, Jeevan Karalkar, Vibhav Borkar, Samiha Sabnis etc. The story of the film is written by Vikram Chavan and screen play is written by Amol Padave
The lyrics is written by Janmejay Patil and Swapnil Jadhav.The cinematography of the film is done by Aniket K . The dhamal songs ‘Aatli Batli Phutali’ and Sang ‘Aai’ sung by Avdhoot Gupte and Swapnil Bandodkar are the main attraction of the film. The kiddies audience will surely love the film which is the perfect blend of comedy and sensitivity and which conveys the message and teaches values through entertainment.

'शाळा सुटलीपाटी फुटलीअसा एकच कल्ला करणाऱ्या छोट्यांनी सध्या पालकांच्या नाकी नऊ आणलेत. परीक्षा संपून उन्हाळी सुट्ट्या चालू झाल्या असून लहानग्यांच्या दंगा-मस्तीलाही उधाण आलंय. तहान-भूक विसरून दिवसभर खेळणाऱ्या आपल्या मुलांची सुट्टी सत्कारणी लागावी ही आई-वडिलांची इच्छा निर्मात्या सुप्रिया चव्हाण यांनी अचूक हेरली ती आपल्या 'आटली बाटली फुटली' या आगामी चित्रपटाद्वारे. रनिंग रिल प्रोडक्शन निर्मित आणि अमोल पाडावे दिग्दर्शित लहान मुलांचे भावविश्व उलगडणारा 'आटली बाटली फुटली' हा चित्रपट येत्या २४ एप्रिलला चित्रपटगृहांत दाखल होतोय.
रागाच्या भरात भांडायचं… 'कधी कट्टी-कधी बट्टी' म्हणत पुन्हा लगेच एकत्रही यायचं यातली खरी गमंत छोट्या दोस्तांसोबतच मोठ्ठ्यांनीही अनुभवलेली आहे. परंतु अलीकडे टीव्ही, इंटरनेटच्या जंजाळात अडकलेली न्यू जनरेशन मात्र निखळ मैत्रीचा आनंद हरवून बसली आहेत. 'आटली बाटली फुटली' हा चित्रपट त्यांना बालपणीच्या याच धम्माल गोष्टींचा आनंद देईल यात शंका नाही. समाजातील बहुतांश अन्यायकारक गोष्टींवर आपण जाणून-बुजून दुर्लक्ष करतो पण लहान मुलांना त्यामागचे हेतू समजत नाहीत. त्यामागच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना हवी असतात आणि त्यासाठी ते जीवाचा आटापिटा करताना दिसतात. अशीच एक घटना प्रेमनगर सोसायटीत घडते जी शरयू, जीवन, विराज, ऐश्वर्या, आर्यन आणि आदित्यला गप्प बसू देत नाही. ही अन्यायकारक घटना कुठली ज्याच्या शोधात ही छोटी मंडळी गुंतलीयेत हे पाहणं उत्कंठावर्धक ठरलंय. तसेच नुसत्याच गमती-जमती नाही तर त्यातून सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट मुलांना आणि पालकांनासुद्धा मार्गदर्शक ठरेल.
 अमोल पाडावे दिग्दर्शित 'आटली बाटली फुटली' या चित्रपटात नवोदित बालकलाकारांचा सहज-सुंदर अभिनय पाहण्यासारखा आहे. यात शरयू  सोनावणे, विराज  राणे, आदित्य कावळे, अनय पाटील, श्रेयाली वहाने, पूर्वा शहा, जीवन करळकर, विभव बोरकर, समिहा सबनीस या बालकलाकारांसोबत संपदा जोगळेकर कुलकर्णी, शेखर फडके, स्वप्नील जाधव, शिवानी कराडकर, असीत रेडीज, सुनील देव, सचिन देशपांडे, प्रमोद बनसोडे  यांच्या ही भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एका विशेष भूमिकेत स्मिताताई तळवळकर 'आटली बाटली फुटली' मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा विक्रम चव्हाण यांनी लिहिली असून पटकथालेखन अमोल पाडावे यांनी केलं आहे. गीतरचना जन्मेजय पाटील, स्वप्निल जाधव यांची तर छायांकन अनिकेत के. यांनी केलं आहे. अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील 'आटली बाटली फुटली', 'सांग आई' या सारखी धमाल गाणी हे या चित्रपटाचं वैशिष्टय आहे.
 लहानांपासून-मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच बालपणीचा हा गोडवा 'आटली बाटली फुटली' या चित्रपटाद्वारा २४ एप्रिलपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहांत जाऊन अनुभवता येईल.  

No comments:

Post a Comment