Sunday, April 26, 2015

मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘आटली बाटली फुटली’ चित्रपटाचा भव्य प्रिमीअर


  आटली बाटली फुटली या सिनेमाचा भव्य प्रिमीअर नुकताच ठाण्यात संपन्न झाला. संग्राम पाटील,गौरव घाटणेकर, केतकी चितळेअक्षया गुरव, अविष्कार दारव्हेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरयाप्रसंगी आवर्जून उपस्थित होते. चित्रपटातील कलाकारांचे आणि निर्माते-दिग्दर्शकांचे मनापासून कौतुक करत सर्व पालकांनी आपल्या पाल्याला हा सिनेमा अवश्य दाखवावा असं उपस्थित मान्यवरांनी आवर्जून सांगितलं.     

रनिंग रिल प्रोडक्शन निर्मित आणि अमोल पाडावे दिग्दर्शित लहान मुलांचे भावविश्व उलगडणारा'आटली बाटली फुटलीया चित्रप शरयू  सोनावणेविराज  राणेआदित्य कावळेअनय पाटीलश्रेयाली वहाने,पूर्वा शहाजीवन करळकरविभव बोरकरसमिहा सबनीस या बालकलाकारांसोबत संपदा जोगळेकर कुलकर्णी,शेखर फडकेस्वप्नील जाधवशिवानी कराडकरअसीत रेडीजसुनील देवसचिन देशपांडेप्रमोद बनसोडे  यांच्या भूमिका आहेत.

लहान मुलाचं भावविश्व खूप मजेशीर असतं. या वयात अनेक गोष्टीचं कुतूहल त्यांना वाटतं असतं. या कुतूहलापोटी ते नानाविध करामती व धाडस करत असतात. या धाडसातून कधीतरी चांगलं ही घडतं. मुलांच्या धाडसाची व त्यांच्या आगळ्या करामतीची गोष्ट 'आटली बाटली फुटलीया चित्रपटातून उलगडते. मुलांच्या निरागसतेतून घडणारी ही गोष्ट आहे.

No comments:

Post a Comment