Sunday, November 16, 2014

'वूमन अॅट वर्क लीडरशिप अवॉर्ड'ने श्रीमती वर्षा मधुसूदन सत्पाळकर सन्मानित

कॉर्पोरेट एक्सलेन्स अवॉर्ड सोहळा संपन्न 

'वूमन अॅट वर्क लीडरशिप अवॉर्ड'ने श्रीमती वर्षा मधुसूदन सत्पाळकर सन्मानित 

सामाजिक बांधिलकी जपत, उद्योजकता आणि व्यावसायिक यशाबरोबरच उदयोन्मुख उद्योजकांमधील वेगळ्या वाटा धुंडाळणाऱ्या उद्योग समूहांचा आणि त्यातील प्रतिभाशाली उद्योजकांचा सन्मान 'लोकमत कॉर्पोरेट एक्सलेन्स अवॉर्ड' देऊन नुकताच करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात मैत्रेय उद्योग समूहाच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांना 'वूमन अॅट वर्क लीडरशिप अवॉर्ड' देऊन गौरविण्यात आले आहे. सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुंबईतील आलिशान हॉटेलात रंगलेल्या या शानदार सोहळ्यात राज्याचे उद्योगमंत्री प्रकाश मेहता यांच्यासह उद्योग विश्वातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते

केवळ वैयक्तिक फायदा पाहता ग्राहकांचे हित आणि पर्यावरणाचा समतोल हे सामाजिक भान राखत देशाच्या प्रगतीच्या ध्यासाने प्रेरित होऊन धडपडणाऱ्या उद्योगसमूहांची ओळख सर्वदूर पसरविणे, भविष्यात याच ध्यासाने कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लोकमतच्यावतीने 'कॉर्पोरेट एक्सलेन्स अवॉर्ड'चे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारांसाठी देशभरातील उद्योगसमूह, कॉर्पोरेट हाउसेसची माहिती, त्यांच्या कार्याचे संशोधन केल्यानंतर विजेत्यांची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी तज्ञांची निवड समिती नेमण्यात आली होती. ऑनवर्ड टेक्नोलॉजीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक हरीश मेहता हे या पॅनलचे अध्यक्ष होते. विविध उद्योगसमूहातील नेतृत्व, कल्पक, सर्जनशील आणि प्रभावी व्यक्तीमत्वांचा यावेळी सन्मान करण्यात आला


'दूरदर्शी सर्वस्पर्शी' या टॅगलाइननुसार विविध उद्योगात यशस्वी कामगिरी करून श्रीमती वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांनी मैत्रेय उद्योग समूहाला नावारूपास आणले आहे. त्यांच्या खंबीर नेतृत्वाची आणि परिश्रमाची दखल घेऊन त्यांना देण्यात आलेला 'वूमन अॅट वर्क लीडरशिप अवॉर्ड' सन्मान निश्चितच अभिमानास्पद आहे.  

No comments:

Post a Comment