Wednesday, October 8, 2014

Star Pravah's upcoming show Runjeeफेम टर्मरिक ब्लिच प्रस्तुत

१३ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता

मुंबई, २९ सप्टेंबर २०१४ : पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातील युवा आणि

स्त्रीवर्गाच्या भावविश्वात बरेच बदल झालेले आहेत. आजच्या युवतींची स्वत:ची अशी स्वप्ने

आणि महत्वाकांक्षा आहेत. एक नवीन आकाश त्यांना खुणावत आहे. आपली स्वप्ने आणि

महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना अजून मोठी भरारी घ्यायची आहे. अशाच नव्या पिढीतील

मुलींचे प्रतिनिधित्व करणारी "रुंजी" स्टार प्रवाह वाहिनीवर १३ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार

रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

“रुंजी” कहाणी आहे रुंजी नाडकर्णी या बिनधास्त, स्मार्ट आणि अवखळ तरुणीची. तिचा आयुष्याकडे

पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. ती बिनधास्त आहे पण उद्धट नाही. ती उस्फुर्त आणि

अवखळ आहे परंतु तेवढीच जबाबदार आहे. तिला काळासोबत चालायला आवडते पण त्याच वेळी तिला

तिच्या सीमादेखील माहिती आहेत. रुंजीच्या अवतीभवती काही चुकीचे घडत असल तर ते तिला

आजीबात सहन होत नाही, अन्याय ती कधी सहन ही करत नाही आणि कुणाला सहन करुही देत नाही.

रुंजीला प्रत्येक गोष्ट नाविन्यपूर्ण पद्धतीने करायला आवडते. खासकरून तिच्या कामाच्या बाबतीत

खुपच आग्रही आहे .रुंजीला पहिल्यापासूनच ब्युटीक्षेत्रात करियर करायचे होते. त्याचीच परिणीती

तिच्या ‘Be Yourself’ या ब्युटी सलोन मध्ये झाली आहे . रुंजीने नेहमीच नाविन्यपूर्ण आणि

आकर्षक हेयरकट करून ग्राहकांकडून पसंतीची पावती मिळवली आहे.

या मालिकेच्या निमित्ताने बोलताना स्टार प्रवाहचे प्रोग्रामिंग हेड जयेश पाटील म्हणाले कि, "

आजच्या युवास्त्रीची स्वत:ची अशी स्वप्ने आहेतच पण त्यांना अजून मोठी भरारी घ्यायची आहे.

एक पाऊल पुढे जायचे आहे. रुंजी हि व्यक्तिरेखा आजच्या मराठी युवावर्गाचे,आणि त्यांची

मानसिकता , महत्वाकांक्षा ,स्वप्ने , ध्येय यांचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे ही मनमोकळी

आणि बिनधास्त रुंजी आजच्या तरुणाईला नक्कीच आवडेल आणि ती त्यांची प्रेरणासुद्धा बनेल.

आम्हाला विश्वास आहे की आजच्या युवतींना नक्कीच रुंजीसारखे व्हावेसे वाटेल."

या मालिकेची निर्मिती महेश तागडे आणि जितेंद्र गुप्ता यांच्या टेल अ टेल या संस्थेची आहे ,

दिग्दर्शन अवधूत पुरोहित यांचे आहे. या मालिकेत पल्लवी पाटील, तुषार कावळे, सई रानडे यासारख्या

नवोदित कलाकारांबरोबर संजय मोने, वंदना वाकनीस, सुरेखा कुडची, प्रसन्ना केतकर , या सारख्या

दिग्दज कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.

रुंजीच्या बिनधास्त आणि मनमोकळ्या आयुष्याचा भाग व्हायला विसरू नका ,

ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार

रात्री ८ वाजता

फक्त स्टार प्रवाहवर

नोव्‍हेंबर २००८ साली सुरू झालेली स्‍टार प्रवाह ही वाहिनी महाराष्‍ट्रातील स्‍टार एंटरटेनमेंट मीडिया

प्रा. लि. (एसईएमपीएल) चा ब्रँड आहे. स्टार प्रवाह वाहिनी महाराष्ट्रातील प्रत्येक वयोगटातील

प्रेक्षकांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करते. आपल्या प्रेक्षकांना निखळ मनोरंजन

देण्याबरोबरच ही वाहिनी आपला सांस्कृतिक वारसा देखील जपत आहे. बदलत्या महाराष्ट्राच्या

प्रेक्षकांच्या आवडी-निवडी बदलल्या आहेत. विशेषत: महाराष्ट्रीयन स्त्रियांच्या विश्वात महत्वाचे

बदल झाले आहेत. हे सर्व बदल स्टार प्रवाह वाहिनी ने टिपले आहेत आणि स्टार प्रवाह वाहिनी

देखील बदलली आहे. ३ फेब्रुवारी २०१४ पासून नव्या रंगात आणि नव्या रुपात आणि " स्वप्नांना पंख

नवे "या ब्रीद वाक्यासह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

"स्वप्नांना पंख नवे" या नवीन ब्रीद वाक्याबरोबर स्टार प्रवाह आजच्या प्रगल्भ, समर्थ ,स्त्रीचे

चित्रण अधिक प्रभावीपणे आपल्या वाहिनीद्वारे करीत आहे . आधुनिक स्त्रीच्या स्वप्नांना भरारी

देण्याचे बळ स्टार प्रवाह आपल्या नवनवीन कथानकाद्वारे करीत आहे आणि उद्याचा महाराष्ट्र

घडविण्यारया स्त्रियांच्या योगदानात आपला महत्वाचा वाटा उचलत आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने आपल्या नवीन रंग -रूपाबरोबरच प्रेक्षकांना भावतील असे मनोरंजनपर

कार्यक्रम सादर करून नवीन पर्वाची नांदी केली आहे . मानसीचा चित्रकार तो, देवयानी, पुढचं पाऊल,

दुर्वा आणि लक्ष्‍य या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत . या

कार्यक्रमांद्वारे स्टार प्रवाह वाहिनीची नाळ मराठी प्रेक्षकांशी घट्ट जोडली गेली आहे.

स्‍टार प्रवाह आजपर्यंत काही सर्वोत्‍तम आणि ब्‍लॉकबस्‍टर चित्रपटही दाखवण्‍यात अग्रेसर ठरला

आहे. त्‍यात नारबाची वाडी ,कोकणस्‍थ, आजचा दिवस माझा, वी आर ऑन-होऊन जाऊ द्या, प्रेमाची

गोष्‍ट, विजय असो, स्‍वराज्‍य, फक्‍त लढ म्‍हणा, मोरया, देऊळ, शाळा आणि तुकाराम यांचा समावेश

आहे. आगामी काळात विविध सामाजिक स्तरांतील प्रेक्षकांना आवडतील , आणि आपल्या रोजच्या

आयुष्याशी सुसंगत असे आशयघन कार्यक्रम प्रसारित करण्याचा प्रयत्न करणार आहे.

No comments:

Post a Comment