Tuesday, July 8, 2014

रंगमंचावर साकारतोय भगवा नृत्यनाट्याविष्कार

रंगमंचावर साकारतोय  भगवा  नृत्यनाट्याविष्कार 

'भगवा'… मराठी क्षात्रतेजावर हिंदुत्वाची फुंकर घालणारा... मराठी मनामनात स्वाभिमान चेतविणारा भगवा... प्रत्येक हिंदुच्या स्वाभिमानाचा विषय असलेल्या भगव्यावर प्रथमच नृत्यनाट्याविष्कार सादर होतोय. महाराष्ट्राला भगव्याची जी थोर परंपरा आहे, त्याची महती आणि माहिती सांगणारा 'जगदंब प्रॉडक्शन' निर्मितीसंस्थेचा हा भव्यदिव्य कार्यक्रम प्रेक्षकांना वेगळी अनुभूती देणारा ठरणार आहे. निर्माते विलास सावंत आणि विजय राणे यांनी 'भगवा' या नृत्यनाट्याविष्काराचे शिवधनुष्य उचलले आहेलेखक विवेक आपटे यांच्या संकल्पनेतून आणि विजय राणे यांच्या दिग्दर्शनातून हि दिमाखदार कलाकृती साकारतेय


५० भगव्या शिलेदारांसह डॉ. अमोल कोल्हे यांचा तडफदार अभिनय यात पहाता येईल. 'राजा शिवछत्रपती' नंतर 'भगवा' च्या निमित्ताने डॉ. अमोल कोल्हे रसिकांसमोर येत असून यात ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि निवेदक अशा तिहेरी भूमिकेत प्रेक्षकांसमोर येताहेत. या नृत्यनाट्याविष्काराची उत्तम संहिता यातील ११ गीते लेखक विवेक आपटे यांनी लिहिली आहेतयातील गीतांना साजेसे संगीत आदी रामचंद्र यांनी दिले असून नृत्य दिग्दर्शन नरेश लिंगायत यांनी केल आहे. 'भगवा' या रंगमंचीय आविष्कारासाठी प्रदीप पाटील यांनी देखणं नेपथ्य केले आहे. 'भगवा' या संकल्पनेवर प्रथमच अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली असून भगव्याच्या उगमाचा आर्यांपासून आतापर्यंतचा प्रवास यात गीतांद्वारे उलगडण्यात आलाय. येत्या १४ जुलैला 'भगवा' या नृत्यनाट्याविष्काराचा शुभारंभाचा प्रयोग होत असून अवघ्या महाराष्ट्रात या कलाकृतीला जोरदार प्रतिसाद मिळेल असा निर्मात्यांना विश्वास आहे.   






No comments:

Post a Comment