Friday, July 11, 2014

After ‘Dhag’, Shivaji Lotan Patil to woo audience with comedy ‘Rajwada’ to release on 8th August
After ‘Dhag’, Shivaji Lotan Patil to woo audience with comedy
‘Rajwada’ to release on 8th August 

After a national award winning film ‘Dhag’, director Shivaji Lotan Patil is ready with his next ambitious project ‘Rajwada’. After successfully trying his hand in tackling serious subjects, Shivaji is now all set to entertain the audience with his first out an out comedy film ‘Rajwada’ which will hit theaters on 8th August.
Like his past films ‘Vavtal’ and ‘Dhag’, ‘Rajwada’ also has a strong social message. However, this time Shivaji is presenting it with ample doses of comedy. “It’s like sugar coated medicine. You have to reach the masses to effectively convey your message and comedy is the best vehicle,” says Shivaji.
‘Rajwada’ stars screen award winner Mangesh Desai in a lead role. After winning hearts with his sensitive portrayal of a puppeteer in award winning ‘Khel Mandla’, Mangesh Desai is back to the genre he is best known for i.e. comedy. Megha Dhade is playing his love interest. Leading comedians such as Abhijit Chavan, Kishor Choughule, Arun Kadam and veteran late artist Kuldeep Pawar are lending able support to Mangesh, Medha and director Shivaji Patil in their endevour to entertain people.
‘Rajwada’ tells the story of an ex-king who after independence has lost his kingdom. Due to his extravagant lifestyle, he has gone bankrupt and his ‘Wada’ is up for sale. In a desperate bid to save his only possession, the ex-ruler and his family go on spree of lies, creating many comical situations and total havoc in the village.The film has been written by Arvind Jagtap. Music is by Vijay Gatlewar. Produced by Deepak Parkhe for Superpower Entertainment, ‘Rajwada’ is slated to hit theaters on 8th August.शिवाजी लोटन पाटीलचा ‘राजवाडा’
उघडणार ८ ऑगस्ट रोजी
‘धग’नंतर आता विनोदाचा धमाका
‘धग’सारख्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आशयघन चित्रपटानंतर दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी सामाजिक विषय घेऊन आला आहे, पण विनोदाच्या माध्यमातून. प्रेक्षकांची पुरेपूर करमणूक करतानाच ‘आपल्या वारशाचे जतन आपणच करायचे असते’ हा महत्त्वाचा संदेश देणारा ‘राजवाडा’ हा चित्रपट येत्या ८ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटातील कलाकारांच्या नावावर नजर टाकली तरी शिवाजी लोटन पाटीलचा हा चित्रपट त्याच्या आधीच्या ‘धग’पेक्षा खूप वेगळा असल्याचे सहज लक्षात येईल. ‘खेळ मांडला’मधील संवेदनशील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्क्रीन पुरस्कार पटकावणारा मंगेश देसाई ‘राजवाडा’मध्ये धमाल विनोदी भूमिकेत दिसणार आहे. त्याला साथ देण्यासाठी अभिजीत चव्हाण, किशोर चौघुले, अरुण कदम, दिवंगत अभिनेते कुलदीप पवार असे विनोदाचे एक्के या चित्रपटात शिवाजी लोटन पाटीलच्या दिग्दर्शनाखाली प्रेक्षकांना हसवण्यासाठी एकत्र आले आहेत.
चित्रपटाच्या नावाप्रमाणेच कथानक राजवाड्याभोवती फिरते. एकेकाळी राजेरजवाड्यांनी आपल्या पराक्रमांच्या जोरावर राज्ये उभारली, प्रजेचं रक्षण केलं, धनदौलत कमावली.. पण नंतर त्यांच्या पुढच्या पिढ्या कुचकामी निघाल्या. पूर्वजांच्या मिळकतीच्या जोरावर आपलं राजेपण मिरवत राहिल्या. पण बड्या घराचे पोकळ वासे लपवताना मात्र त्यांच्या नाकी नऊ येऊ लागले. अशाच एका संस्थानिकाची ही कथा आहे. गावातल्या अगदी सामान्य शेतकऱ्याकडूनही कर्ज घेतलेले, अय्याश वृत्तीचे संस्थानिक भालचंद्र घोरपडे (कुलदीप पवार)

गावकऱ्यांचा ससेमिरा चुकवण्यासाठी मुकुंद (मंगेश देसाई) या चोराला आपला मुलगा म्हणून उभं करतात. संस्थानिकाच्या तिजोरीवर डल्ला मारता येईल, या विचाराने मुकुंदही तयार होतो, पण भलत्याच संकटात अडकतो.
“पराक्रमी पूर्वजांच्या पुढच्या पिढ्या नादान निघाल्या तर आपल्या संचिताची कशी धूळधाण उडते, हे आपल्याला दाखवायचं होतं. विनोद हे फार प्रभावी अस्त्र आहे. कुठलीही कडू गोष्ट विनोदाच्या आवरणात सादर केली तर ती पचायला सोपी जाते, म्हणूनच हा विचार मांडण्यासाठी यावेळी विनोदाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला,” असं शिवाजी लोटन पाटील याने सांगितलं. विशेष म्हणजे विनोदाचा शिवाजी लोटन पाटीलचा हा पहिलाच प्रयत्न असून ‘धग’सारख्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटानंतर शिवाजी संपूर्णपणे वेगळ्या धाटणीचा असा विनोदी चित्रपट करत असल्यामुळे ‘राजवाडा’विषयी कुतुहल निर्माण झालं आहे. कथा-पटकथा-संवाद अऱविंद जगताप यांची असून संगीत विजय गटलेवार याचं आहे. ‘सुपरपॅावर एंटरटेनमेंट’ या बॅनरखाली निर्माते दीपक पारखे यांची पहिलीच निर्मिती असलेला ‘राजवाडा’ ८ ऑगस्ट रोजी राज्यभरात प्रदर्शित होत आहे.
 

No comments:

Post a Comment