Tuesday, May 13, 2014

'तुझी माझी लवस्टोरी' चे म्युझिक लॉंच

'तुझी माझी लवस्टोरी' चे म्युझिक लॉंच   







  

'स्वप्नांच्या गावी जाणं, आता रोजच होत असतं. जागेपणी देखील आता, स्वप्नांतच जगणं असतं' बहुतेक प्रेमात पडल्यावर सगळ्यांच हे असंच होत असतं. परस्परांतले समज गैरसमज, कधी वैचारिक मतभेद, कधी अपेक्षांच्या कठपुतळया एक ना अनेक अडचणी या सगळ्यांतून तरून किनाऱ्याला लागणारं प्रेम एखादंच. कित्येकदा काही प्रेमवीरांच हे प्रेम व्यक्त होत तर कधी अव्यक्तच राहतं. सध्या रुपेरी पडद्यावर देखील प्रेमाचा रंग चढला असून प्रेमकथांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळतेय. हेच लक्षात घेत निर्माते - दिग्दर्शक ऋषिकेश मोरे 'तुझी माझी लवस्टोरी' ही नवी प्रेमकथा घेऊन आले असून, खूप उशीर होण्यापूर्वी 'आपलं प्रेम व्यक्त करा' हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी यातून केला आहे. ऐन पावसाच्या रोमॅंटिक वातावरणात ४ जुलैला हा मराठी चित्रपट राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत असून त्यापूर्वी यातील सुमधूर प्रेमगीतांची ध्वनीफित एका दिमाखदार सोहळ्यात प्रकाशित करण्यात आली. अनेक मान्यवरांच्या उपस्थित रंगलेल्या या सोहळ्यात चित्रपटातील कलाकारांच्या लाईव्ह परफॉर्मन्सचा आस्वाद रसिक प्रेक्षकांनी घेतला.   

'सिल्व्हर ऑटमन प्रॉडक्शन्सप्रस्तुत  'तुझी माझी लवस्टोरी' हा चित्रपटच मुळात प्रेमकथेवर आधारित असल्याने याचे संगीत तितकेच खास असणार आहे. अश्विनी शेंडे यांनी लिहिलेल्या यातील आशयघन प्रेमगीतांना हिंदीतील ख्यातनाम संगीतकार बापी तुतूल यांनी तरुणाईला साद घालणारं संगीत दिलंय. प्रेमाच्या विविध भावछटा रेखाटणाऱ्या गीतांचा यात समावेश असून सिनेमात पाच गीते आहेत. 'सुटलेत हात ही', 'मी बेहका', 'परसून जशी', 'तुझी माझी लवस्टोरी' या गीतांसोबत एक थीम सॉंग अशी वैविध्यपूर्ण गीते यात आहेत. गायक ऋषिकेश कामेरकर आणि गायिका नेहा राजपाल यांच्या आवाजात ती स्वरबद्ध करण्यात आली आहेत. 
  
इंद्रनील आणि अदिती यांची अनोखी लवस्टोरी सिनेमात पहाता येणार आहे. योगायोगाने अदितीच्या सहवासात आलेला इंद्रनील तिच्या प्रेमात पडतो. त्यादरम्यान त्याला अनपेक्षित प्रसंगांना सामोरे जावे लागते. प्रेम व्यक्त करण्याच्या इंद्रनीलच्या प्रयत्नांना अदिती काय आणि कसा प्रतिसाद देते, यावर 'तुझी माझी लवस्टोरी' ची कथा बेतली आहे. चित्रपटात इंद्रनीलची भूमिका गौरव घाटणेकरने साकारली असून अदितीच्या भूमिकेत श्रुती मराठेने त्याला साथ दिली आहे. चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक ऋषिकेश मोरे यांनी लिहिली असून संवाद प्रशांत लोके यांनी लिहिलेतऋषिकेश मोरे यांचा 'पिकनिक' सिनेमानंतर येत असलेला 'तुझी माझी लवस्टोरीहा दुसरा चित्रपट आहे. प्रेमकथेला साजेस सिनेमाचे छायाचित्रण अर्जुन सोर्टे यांनी केलं असून संकलन रोहन देशपांडे यांचे तर कलादिग्दर्शन संतोष फुटाणे यांनी केलंय'तुझी माझी लवस्टोरीमध्ये श्रुती मराठे, गौरव घाटणेकर यांच्यासोबत संकेत मोरे, कल्पना साठे, उदय लागूनेहा बाममृणालिनी जांभळेअशोक कुलकर्णी, श्रीकांत कामत, वरद चव्हाण, प्रशांत नेमन या कलाकारांच्या भूमिका आहेत. ४ जुलैला 'तुझी माझी लवस्टोरीप्रदर्शित होईल त्यापूर्वी प्रकाशित होत असलेली गीते तरुणाईच्या निश्चितच पसंतीस उतरतील.

No comments:

Post a Comment