Tuesday, August 13, 2019

फेविक्रिलने सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल येथे मिनी तिरंगा कॅनव्हाससह भारताचा सर्वात मोठा नकाशा तयारकरून लिम्का बुकात विक्रम नोंदवण्याचा केला प्रयत्न


~ 25*25 फूट इतक्या प्रचंड आकाराच्या नकाशाचे आज अनावरण ~

11 ऑगस्ट, 2019, मुंबईफेविक्रिल या पिडिलाइट इंडस्ट्रीजच्या आघाडीच्या आर्ट  क्राफ्ट ब्रँडने नवी मुंबईतील सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल येथे मिनीतिरंगा कॅनव्हास असणारा भारताचा सर्वात मोठा नकाशा तयार करून लिम्का बुकात नाव नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे.
हा उपक्रम ब्रँडच्या #ऑलकॅनआर्ट या उपक्रमाचा भाग होताफ्लुइड आर्ट तंत्राद्वारेकौशल्य  अचूकता या पलीकडे विचार करूनकलेचा सरावकरण्यासाठी प्रत्येकाला उत्तेजन देणेहे या उपक्रमाचे उद्दिष्ट होतेफ्लुइड आर्टसाठी कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नसते आणि लोकांनामुक्तपणे पेंट करता येते  त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देता येतो.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीनवरआज सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल येथे या अप्रतिम कलाकृतीचे अनावरण करण्यात आलेया प्रचंड नकाशाची लांबी 25 फूट  रूंदी 25 फूट आहेपार्किन्सन्सचे 97 रुग्ण, 300+ शालेय विद्यार्थी  68 कॉर्पोरेट कर्मचारी यांनी तयार केलेल्या सर्जनशील कलाकृती एकत्र करूनहा नकाशा तयार करण्यात आला आहेसहभागींनी फेविक्रिल अॅक्रिलिक रंगांचा वापर करून कॅनव्हास रंगवले आहेत.    

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानेभारताचे रंग साजरे करण्यासाठीहा सर्जनशील उपक्रम 11 ऑगस्ट 2019 ते 18 ऑगस्ट 2019 या कालावधीत दर्शवलाजाणार आहे.

पिडिलाइट इंडस्ट्रीज लि.चे कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंiतनु भनजा यांनी सांगितले, “सर्जनशील असणाऱ्या प्रत्येकाला पेंटकरता येऊ शकते  जादू घडवता येऊ शकतेहे #ऑलकॅनआर्ट या उपक्रमाद्वारे आम्हाला सर्वांना सांगायचे आहेऔपचारिक प्रशिक्षण घेण्याचीआवश्यकता नाहीफ्लुइड आर्ट ही मुक्तपणे व्यक्त होते आणि नवशिक्यांनाही या कलेचा सराव करता येऊ शकतोत्यामुळे प्रत्येकासाठी हा कलेचाउत्तम नमुना आहेस्वातंत्र्यदिन साजरा करण्याचातसेच सर्जनशीलता रंजक बनवण्याचा फेविक्रिल उपक्रमाचा भाग म्हणूनविविध क्षेत्रांतीललोकांना त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी आम्ही एक व्यासपीठ उपलब्ध करायचे ठरवलेआम्ही यामार्फत लिम्का बुकात आमचे नाव नोंदवूशकूअसा विश्वास आहे.”

सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलचे सेंटर हेड निलेश सिंग यांनी सांगितले, “कला ही केवळ सर्जनशीलतेपुरती मर्यादित नाहीएरवी शहरातील धकाधकीच्याजीवनात कार्यमग्न असणाऱ्या लोकांना यामुळे कल्पनाशक्तीलाही चालना देता येते.  फेविक्रिलच्या या विशेष उपक्रमात सर्व वयोगटातील लोकांनीसहभागी व्हावेअसे आमचे आवाहन आहेसीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलमध्येसमाजाला सहभागी करून घेणाऱ्या  मोठा परिणाम साधणाऱ्या अशा खासउपक्रमाचे आयोजन करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो आहे.”

दादर येथील अवर लेडी ऑफ सॅल्व्हेशन चर्च येथे आणि श्री वर्धमान स्थानकवाली जैन संघ बोरिवली येथे पार्किन्सन्स डिसिज अँड मूव्हमेंट डिसऑर्डरसोसायटी (पीडीएमडीएसयासाठी सत्र आयोजित करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आलीपार्किन्सन्सच्या 97 रुग्णांनी कार्यशाळेमध्ये सहभागघेतला आणि फ्लुइड आर्ट तंत्राचा वापर करून कॅनव्हासवर रंग उमटवून सर्जनशीलतेला वाट करून दिलीआव्हानांचा सामना करत असूनहीयाप्रकारच्या कलेमुळे रुग्णांना त्यांची कलात्मकता दाखवणे  सुप्त गुणांना वाव देणे शक्य झाले.

कार्यक्रमाचा दुसरा भाग मालाड येथील एमकेएसस्कूल येथे आयोजित केला होतात्यामध्येया विशेष कला प्रकाराचा आनंद घेण्यासाठी 300+ शालेय विद्यार्थी एकत्र आले होतेयाचप्रमाणेशहरातील कॉर्परेटनी कॅनव्हास तयार केले  या उपक्रमासाठी दिले.

सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये कलेला अनन्यसाधारण महत्त्व दिले जातेकारण मॉलने कलाकार  गुणवान यांना त्यांची कला सादर करण्यासाठीमॉलमध्ये पाचारण करून त्यांना नेहमी उत्तेजन दिले आहेविरोट कोहलीचे सर्वात मोठे दिया पोर्ट्रेटसचिन तेंडुलकर यांचे 46X24ft मोझाइक आणिमहाराष्ट्र दिवसदरम्यान महाराष्ट्रीयन संस्कृती दर्शवणारी 60X40 फूट रांगोळी ही मॉलमध्ये दर्शवण्यात आलेल्या कलाकृतींची काही उदाहरणे आहेत.

No comments:

Post a Comment