Thursday, April 4, 2019

‘स्वामीधाम कलाश्रय’ साठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा पुढाकार वयोवृद्ध कलाकारांसाठी वृद्धाश्रम उभारणार



कला आणि सामाजिकता यांना वेगळं करता येत नाही. कलावंत हा कलाकेंद्री असलाच पाहिजे पण त्याला सामाजिक भानही असायलाच हवे. काही जगावेगळे काम करीत आहोत असा आव न आणतासमाजाचं आपण काही देणं लागतो या जाणिवेतून अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी एका सामाजिक उपक्रमाची जबाबदारी घेत ५० वर्षांपुढील कलाकारांसाठी ‘ ‘स्वामीधाम कलाश्रयच्या निर्मितीचा ध्यास घेतला आहे.
आपल्या या ध्यासाबद्दल बोलताना त्या सांगतात कीअनेक वयोवृध्द कलाकार वाईट अवस्थेत दिसले. आपण बऱ्याचदा कामामधे व्यस्त असल्याने नातेवाईकांशी संबंध ठेवले जात नाहीतकुंटुंबातील केवळ पोरंबाळं, बायको वगळता तसा जवळचा संबंध कोणाशी ठेवला जात नाही..शुटिंग युनिट आपलं कुटुंब होतं..! एकदा वय व्हायला लागलं की आधारा ला पटकन कोणी भं रहात नाही..तर आपणच आपला आधार व्हावं असं मनात आल.. अनेक वृद्धाश्रम असूनही कलाकारांसाठी वृध्दाश्रम असावं असं वाटलं आणि त्यातूनच ‘स्वामीधाम कलाश्रय’ ची कल्पना सुचली. आमच्या या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी श्री.चिंतामणी रहातेकर (काका) यांनी मदतीचा हात पुढे केला. श्री. अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ, अंबरनाथ संचालित स्वामीधाम मोग्रज,आनंदवाडी, कर्जत येथे कलाकार वृद्धाश्रमासाठी दीड एकर जागा दिलेली आहे. विशेष म्हणजे या संस्थेचे सर्वेसर्वा चिंतामणी रहातेकर यांचा त्याच ठिकाणी स्वत:चा वृद्धाश्रम असूनही केवळ कलेच्या प्रेमापोटी व कलाकारांनाही स्वत:च असं वास्तव्य असावं या आगळ्या कल्पनेकरिता त्यांनी हा मदतीचा हात पुढे केला आहे. ‘स्वामीधाम कलाश्रय’ साठी चिंतामणी रहातेकर यांचा भक्कम पाठिंबा मिळाल्यामुळेच हे पाऊल उचलू शकल्याचे विशाखा सुभेदार सांगतात.
श्री. स्वामी समर्थांच्या कृपेने ६ एप्रिलला याच ठिकाणी अन्नछत्राचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. त्याचवेळी ‘स्वामीधामकलाश्रय’ वृद्धाश्रमाचा श्रीगणेशा होणार आहे. हा  केवळ वृद्धाश्रम नाही तर ‘स्वामीधाम कलाश्रय’ या नावाला साजेसे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा मानस असून त्यात नाट्य वर्कशॉप्सपरफॉर्मिंग हॉलवाचनालयबागकाम,स्विमिंग पूलखेळविरंगुळा अशा अनेक गोष्टींचा समावेश असणारआहे.

No comments:

Post a Comment