Monday, August 3, 2015

झी टॉकीजवर फँड्री चित्रपटाचा टेलिव्हिजन प्रीमिअर






पठडीबाहेरच्या विषयांनाही मराठी चित्रपटांच्या प्रेक्षकांनी नेहमीच दाद दिली आहे. आजही जातीपातीची समस्या समाजाचा एक अविभाज्य भाग बनून राहिलेली आहे. स्वप्नाच्या आड आपल्या समाजातील जातीव्यवस्था येते त्यावेळी स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला खरंच उमगला आहे का? हा प्रश्न पडतो. हाच प्रश्न अधोरेखित करणाऱ्या फँड्री चित्रपटाचा टेलिव्हिजन प्रीमिअर स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधतरविवार १६ ऑगस्ट दुपारी १२.०० वा. आणि सायं ६.३० वा. झी टॉकीजवर प्रेक्षेपित होणार आहे.

मराठी चित्रपटाची पारंपरिक चौकट मोडणाऱ्या 'फँड्री' या वास्तवदर्शी चित्रपटाने समाजमनाचा आरसा प्रेक्षकांसमोर मांडला. समाजात आजही काय घडतंय हे दाखवताना या चित्रपटाने साधलेल्या परिणामकारक अनुभवाने  संवेदनशील मनाला विचार करायला,आत्मपरीक्षण करायला नक्कीच भाग पाडलं.

पौगंडावस्थेतील कोवळे प्रेमस्वप्नाळूपणा आणि जातिभेदाच्या भिंतींची कटू जाणीवही समर्थपणे मांडणाऱ्या 'फँड्री' चित्रपटाचा प्रेमकथेच्या पलीकडे जाऊन ती इथल्या समाज आणि जातीव्यवस्थेवर प्रखरपणे भाष्य करणाऱ्या या चित्रपटातून गरिबांवर होणा-या अन्यायाचं एक यथार्थ दर्शन घडतं. आपण भारतीय’ आहोत म्हणजे काय आहोत? हेदेखील माहिती नसलेल्या गावगाडय़ात. ज्यांच्याकडे माणूस म्हणून पाहायलाही समाज तयार नाही,माणूस’ म्हणून जगण्याचा अधिकारच नाकारल्या गेलेल्या समाजातील ‘नाही रे’ वर्गाचा ही वेध या चित्रपटात प्रभावीपणे घेतला आहे.  

साध्या  सरळ चित्रभाषेतून उलगडत जाणारा हा चित्रपट मानवतावादी दृष्टिकोन जपत एका वेगळय़ा समाजाची रचना करायला हवीअसा प्रभावी संदेश देतो. सोमनाथ अवघडे,राजेश्वरी खरातसुरज पवारकिशोर कदमछाया कदम यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

No comments:

Post a Comment