Sunday, June 7, 2015

त्या तिघींची गोष्ट सांगणार ‘शुगर सॅाल्ट आणि प्रेम’









प्रथमच एकत्र दिसणार सोनाली कुलकर्णीशिल्पा तुळसकर आणि क्रांती रेडकर
 आज स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहेत. किंबहुना पुरुष्यांच्याही दोन पावलं पुढे जात देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा उचलत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या स्त्रियांचं आपलं एक विश्व आहे. प्रत्येकीचा आपला एक मैत्रीणींचा ग्रुप आहे. हाच ग्रुप एकमेकींच्या सुख दुःखात मागे पुढे खंबीरपणे उभा राहून जीवनातील प्रत्येक लढाई समर्थपणे लढण्यास त्यांना पाठबळ देत असतो.शुगर सॅाल्ट आणि प्रेमहा सिनेमा अशाच तीन मैत्रीणींची कथा सांगणारा आहे.
अभिषेक जावकर व गुरुनाथ मिठबावकर यांची प्रस्तुती असलेलाशुगर सॅाल्ट आणि प्रेम’ हा सिनेमाआरात्रिका एंटरटेनमेंट प्रा.लि च्या बॅनरखाली तयार झाला आहे. सोनाली बंगेरा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून संकल्पना कथापटकथा त्यांचीच आहे. दिग्दर्शिका सोनाली बंगेरा यांनी शुगर सॅाल्ट आणि प्रेममध्ये नातेसंबधमैत्रीआणि जीवन याची अचूक सांगड घातली आहे.आयुष्यावर भाष्य  करणाऱ्या या चित्रपटात तीन मैत्रीणी आणि त्या अनुषंगाने तीन जोडप्यांची गोष्ट मांडण्यात आली आहे.
शुगर सॅाल्ट आणि प्रेम’ या चित्रपटातसोनाली कुलकर्णीशिल्पा तुळसकर,क्रांती रेडकर या तीन मैत्रीणीआहेत. प्रत्येकीचं आपलं कौटुंबिक विश्व आहे.पण त्याही पलीकडे या तिघींचं मैत्रीचं विश्व काही औरच आहे.यात सोनालीची समीर धर्माधिकारीसोबतशिल्पाचीअजिंक्य देव सोबत तर क्रांतीचीप्रसाद ओकसोबत जोडी जमली आहे. यतीन कार्येकर यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. 
या तिघींच्या रुपात सोनाली बंगेरा यांनी जीवनातील तीन टेस्ट पडद्यावर सादर केल्या आहेत. या तीन नायिका एका ठराविक परिस्थितीमुळे एकत्र येतात.त्यानंतर त्यांच्यात घनिष्ठ मैत्री होते. एकमेकींमध्ये त्या गुंतल्या जातात.सोनालीने आदिती नावाचं पात्र साकारलं आहे.ही उच्चविद्याविभूषित आजच्या युगातील आधुनिक स्त्री आहे.शिल्पाने अनन्याची भूमिका केली आहेजी गृहिणी आहे. तिच्या पतीचा खूप मोठा व्यवसाय आहे. क्रांती ही सौम्याच्या रुपातदिसणार आहे.हॅप्पी गो लकी टाईपचं हे पात्र आहे. नवरा म्हणजे संपूर्ण जग मानणारी ही स्त्री आहे. या तिघी एकत्र येतात आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळते. ही कथा सर्वांशी कनेक्ट होणारी आहे. रिअल लाईफमधून रील लाईफ मध्ये आलेली पात्र या चित्रपटात पाहायला मिळतील.
अमजद खान आणि आकाश वाघमारे यांनीशुगर सॅाल्ट आणि प्रेम’ चा अॅडीशनल स्क्रीन्प्ले लिहिला आहे. त्यावर समीर सुर्वे यांनी संवादलेखन केलं नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार यांनी केलं असून राहुल जाधव यांच्याकॅमेरयातून शुगर सॅाल्ट आणि प्रेम’ सिनेमाचं केलेलं चित्रीकरण प्रेक्षकांना नवा अनुभव देणार ठरेल. गीतकार मंदारचोळकर यांनी या चित्रपटासाठी गीतरचना केली असून सौमिल श्रुंगारपुरे आणि सिद्धार्थ महादेवन यांनी संगीत रचना केली आहे. माधव विजय यांनीशुगर सॅाल्ट आणि प्रेम’ लापार्श्वसंगीत दिलं आहे. तर संकलन निलेश गायकवाड यांनी केलं आहे. सुजीत कुमार यांनी या चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शन  केलं आहे. कला दिग्दर्शनाची जबाबदारी प्रशांत राणे यांनी सांभाळली आहे. येत्या १२ जूनला हा चित्रपट रसिकांसमोर येणार आहे.

--------------------------------


Sugar Salt ani Prem will tell the tale of three women

Sonali Kulkarni, Shilpa Tulaskar and Kranti Redkar will act together for the first time in a film Today in every field whether its aeronautics or software, companies women are giving equal contribution or we can say they are two steps ahead of their male counterparts when it comes to contributing for the growth of the nation. The women who are on top in every field have their own world. Every women has her own group of friends and that group not only  supports in their ups and downs but also gives them the strength to go on. The film Sugar, Salt ani Prem is  about these three friends.

Sugar, Salt ani Prem  which is presented by  Abhishek Jawkar and Gurunath Mithbavkar is made under the banner of Aaratrika Entertainment Pvt. Ltd. The film is directed by Sonali Bangera and the credit of concept, story and screenplay also goes to her. Director SonaliBangera has interwoven the elements like human relationships, friendship  and love in a perfect manner. The film which makes a comment on the philosophy of life portrays the story of three couples.

Sonali Kulkarni, Shilpa Tulaskar and Kranti Redkar are friends. In Sugar, Salt ani Prem, Each of them have her own family and domestic life. But beyond that the three of them have their own world based their friendship. There are three couples in the film those are Sonali and Sameer Dharmadhikari, Shilpa Tulaskar and Ajinkya Deo and Kranti Redkar and Prasad Oak. Actor Yatin Kareykar plays a significant role in the film.

These three female protagonists come together due to some crisis. Later they become best friends and get involved with each other. Sonali portrays the character of Aditi in the film who is highly educated modern woman. Shipla essays the character of Anannya who is a housewife. Her husband owns a huge business empire. Kranti Redkar plays happy go lucky type woman Sommya for whom her husband is her whole world. These three women come together and it becomes a turning point of their lives. Since the audience will get to watch the real life characters in the real life, they can relate to the story.

Majad Khan and Akash Waghmare has written the additional screenplay of the film. Watching the film through Rahul Jadhav’s camera will be a novel experience for the audience. Lyricist Mandar Cholkar has penned the lyrics of the film while Siddharth Mahadevan and Soumil Shringarpure has composed the music. Madhav-Vijay has given the music to the film and editing is done by Nilesh Gaikwad. Sujit Kumar has done the dance direction of the film. Prashant Rane has done the art direction of the film.

No comments:

Post a Comment