Sunday, April 12, 2015

सावरकरवादी तरुणाचा वैचारिक लढा



अनेक गुणी कलावंत  मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. श्रीकांत भिडे हा  युवा कलावंत त्यापैकीच एक. आगामी 'व्हॉट अबाऊट सावरकर?' या चित्रपटातील 'अभिमान मराठे' या मध्यवर्ती व्यक्तिरेखेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका राजकीय नेत्याकडून सावरकरांचा झालेला अपमान 'अभिमान मराठे'ला सहन होत नाही. त्याविरुद्ध तो बंड करून उठतो.या अपमानाचा बदला घेण्याचा निर्धार करतो.त्याचा हा निर्धार,आत्मसन्मानाचा लढा यशस्वी होतो का? त्याच्या बंडाची दखल घेतली जाते का? याची कथा 'व्हॉट अबाऊट सावरकर?' सिनेमातून पाहता येणार आहे. भावनिक संघर्ष,वाट्याला आलेली अवहेलना, राजकीय डावपेच या सगळ्याचा सामना करत अभिमान मराठेचा झालेला सर्वसामान्य ते जननायकापर्यंतचा प्रवास 'व्हॉट अबाऊट सावरकर?' सिनेमातून आपल्याला पाहता येणार आहे. 
 
या गुणी कलावंताने ही भूमिका तडफदारपणे सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. रंगभूमीवर बरीच वर्षे काम करणारा श्रीकांत हा उत्तम नृत्यकारही आहे. काही चित्रपटांत व लघुपटांमध्येही त्याने उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. अभिमान मराठेच्या या संघर्षमयी प्रवासातील भूमिकेचे वेगवेगळे कंगोरे चित्रपटात पाहता येणार आहेत. रिटेक अनलिमिटेड फिल्म प्रॉडक्शन आणि औरस अवतार एंटरटेनमेंट प्रस्तुत रोहित शेट्टी, अतुल परब निर्मित 'व्हॉट अबाऊट सावरकर?' हा चित्रपट आजच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व करतो. अन्यायाविरुद्ध लढताना अभिमान मराठेची झालेली घुसमट व त्या विरोधात आवाज उठवण्याची त्याची प्रखर तडफ हे मानसिक द्वंद्व श्रीकांत भिडेने खुबीने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पोंक्षे, विवेक लागू, अविनाश नारकर, अतुल तोडणकर, सारा श्रवण या कलाकरांच्या भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन गावडे यांनी केलं आहे.  

अभिमानचा हा संघर्षमय प्रवास पडद्यावर पाहणं रोमांचकारी ठरणार आहे. येत्या १७ एप्रिलला 'व्हॉट अबाऊट सावरकर?' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.  

No comments:

Post a Comment