Thursday, November 27, 2014

Rama Madhav in New Zealand
First ever Marathi film will be showcased in New Zealand


Rama-Madhav, the landmark Marathi period drama got loads of accolades from the audience as well as the film critics due to the brilliant performance of the whole team of seasoned actors. The audience got the opportunity to experience the golden era of Peshwai through Rama-Madhav which was presented by Producer Bhupat Bodar’s Shivam-Jemin Enterprise Pvt. Ltd. and directed by Mrinal Kulkarni. Rama-Madhav has won the hearts of the audience from Maharashtra as well as audience from the Western countries like England and America. Now the historic film is all set to release on November 30th in Hoyts Xtrem theatre in Auckland city, New Zealand. Rama Madhav is the first Marathi film which has got the honour of being released in New Zealand. Hence it is matter of pride for the Marathi speaking audience. The Indians living in New Zealand will get to
re-live the glorious Peshwai era through the film.
In Rama Madhav, the audience got to watch the chemistry between Nanasaheb Peshwa and Gopikabai portrayed by Ravindra Mankani and Mrinal Kulkarni after a long gap. The role of cunning Raghobadada is played by Prasad Oak and the role of intelligent and beautiful Anandibai is played by Sonali Kulkarni. The newcomer duo Alok Rajwade and Parna Pethe are playing the leading pair in the film. Dr. Amol Kolhe has essayed the role of Sadashivraobhau and Shruti Marathe has portrayed the role of Parvatibai.
A story based on the significant era of Peshwa’s, characters of various hues, a team of seasoned actors, prominent technicians, grand sets are some of the key elements of the film. The makers of the film are confident that the audience in New Zealand will love Rama Madhav which is based on unique and everlasting love story of Madhavrao Peshwa and his wife Ramabai.

न्यूझीलँडमध्ये अवतरणार पेशवाई
३० नोव्हेंबरला 'रमा माधवन्यूझीलँडमध्ये प्रदर्शित


दिग्गज कलाकार - तंत्रज्ञांच्या टीमवर्क मधून साकारलेल्या 'रमा माधव'  या ऐतिहासिक चित्रपटाला प्रेक्षकांसोबत समीक्षकांच्या पसंतीची मनमुराद दाद मिळाली. निर्माते भुपत बोदर यांच्या 'शिवम जेमिन एंटरप्राइज प्रा. लि.' प्रस्तुत, मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'रमा माधव' चित्रपटातून पेशवाईचा दैदिप्यमान काळ प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता आला. महाराष्ट्रासोबत सातासमुद्रापार परदेशात अमेरिका, इंग्लंड मधील रसिकांची मने जिंकणारा 'रमा माधव' हा ऐतिहासिक मराठी चित्रपट येत्या ३० नोव्हेंबरला न्यूझीलँड मधील ऑकलँड शहरातील व्होट्स एक्स्ट्रीम (Hoyts Xtreme) चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात न्यूझीलँडमधील चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या पहिल्या मराठी सिनेमाचा मान 'रमा माधव' चित्रपटाला मिळाला आहे. समस्त मराठी भाषिकांसाठी ही निश्चितच अभिमानास्पद बाब असून न्यूझीलँड मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामुळे स्थानिक भारतीयांना पेशवाईचा थाट अनुभवता येणार आहे.

नानासाहेब पेशवे आणि गोपिकाबाईंच्या व्यक्तिरेखेतील रवींद्र मंकणी आणि मृणाल कुलकर्णी यांची केमिस्ट्री 'रमा माधव'च्या निमित्ताने प्रेक्षकांना बऱ्याच दिवसानंतर पाहता आली. करारी राघोबादादांच्या व्यक्तिरेखेत प्रसाद ओक यांनी रंग भरले असून कुशाग्र बुद्धीची सोंदर्यवती असणारी राघोबादादांची पत्नी आनंदीबाईंची भूमिका सोनाली कुलकर्णी साकारली आहे. सदाशिवरावभाऊची व्यक्तिरेखा अमोल कोल्हे यांनी साकारली असून श्रुती मराठे या पार्वतीबाईंच्या भूमिकेत आहेत. अलोक राजवाडे आणि पर्ण पेठे ही नवोदीत जोडी या सिनेमातून 'रमा माधव'च्या मध्यवर्ती भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे.

ऐतिहासिक कथानक, विविधरंगी व्यक्तिरेखा, अनुभवी स्टारकास्ट, ख्यातनाम तंत्रज्ञ, भव्य सेटअप, मृणाल कुलकर्णीचे दिग्दर्शन असलेल्या ‘रमा माधव’ चित्रपटात रमाबाई आणि माधवराव यांच्या सहजीवनाची अजरामर प्रेमकथा न्यूझीलँडमधील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा निर्मात्यांना विश्वास आहे. 

No comments:

Post a Comment