Sunday, February 2, 2020

सुनील गोडबोले लग्नातले आधुनिक ‘नारायण’


लग्नघरातल्या धावपळीचा कर्ता-धर्ता ‘नारायण’ याची ओळख पु.ल देशपांडे यांनी आपल्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातून घडवलीच आहे. आगामी ‘बायको देता का बायको’ या मराठी चित्रपटातूनही हा नारायण आपल्या भेटीला येणार आहे. अभिनेता सुनील गोडबोले यांनी आपल्या अनोख्या ढंगात ही व्यक्तिरेखा रंगवली आहे. चित्रपटातील हा ‘नारायण’ काहीशा वेगळा आहे. मांडवात मदतीला हजर असणारा हा ‘नारायण’ सामाजिक जबाबदारी म्हणून विवाह जमवण्याचे काम सुद्धा चोखपणे करतो. वाय डी फिल्मस्’ निर्मित या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन सुरेश साहेबराव ठाणगे यांचे तर निर्मिती धनंजय रामदास यमपुरे यांची आहे. येत्या २१ फेब्रुवारीला हा धमाल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लग्न म्हणजे दोन कुटुंबांमध्येत्यातील व्यक्तींमध्ये नातेसंबंध निर्माण करणारे सामाजिक बंधन. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपलं लग्न चांगल्याप्रकारे व योग्य अनुरूप स्थळाशी व्हावं अशी अपेक्षा असते. आधुनिक युगातला हा नारायण अत्यंत शिताफीने ही स्थळ जुळवतो पण ती जुळवताना तो काय आणि कशा करामती करतोहे रंजकपणे ‘बायको देता का बायको’ या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. या भूमिकेबद्दल बोलताना सुनीलजी सांगतात कीस्पष्टवक्तेपणा आणि विचारी फटकळपणा ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत. लग्नाच्या बाजारात काय खपतंफक्त सौंदर्येतारुण्य आणि पैसा! या तीनच गोष्टी खपतात. गुणचारित्र्यसंस्कार चालीरीती यांचा विसर पडत चालला आहे तो करून देण्याचा प्रयत्न हा ‘नारायण’ या चित्रपटात करताना दिसणार आहे.
सुनील गोडबोले यांच्यासह सुरेश ठाणगे, श्वेता कुलकर्णीआरती तांबेअभिलाषा पाटीलप्रतीक पडवळसिद्धेश्वर झाडबुके किशोर ढमाले, अमोल पठाडेप्रीतम साळुंखेहनुमंत गणगेप्रमिला जगतापवैष्णवी अनपट,  वैशाली जाधवराणी ठोसरप्रशांत जाधवमहादेव सवईअश्विनी वाव्हळसंगीता कोठारी या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. 

No comments:

Post a Comment