Thursday, June 9, 2016

'Let’s Change 2016' या शाळांसाठीच्या प्रकल्पाचा लवकरच शुभारंभ


चित्रपटाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती

माननीय पंतप्रधानांनी २०१४ मध्ये ‘स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केल्यापासूनअनेक प्रयत्न केले गेले आहेत. असाच अत्यंत विचारपूर्वक,नियोजनबद्धपणे हाती घेतलेला Let’s Change' हा व्यापक प्रकल्प आहे. अस्वच्छ परिसराचं मूळ कारण, निष्काळजीपणे कचरा भिरकावणे, थुंकणे याला पायबंद घालण्याचा हा सर्वंकष प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी साप्ताहिका 'तासिका या उपक्रमामध्ये १५४/१५ या सरकारी अध्यादेशान्वयेLet’s Change' हा अधिकृत उपक्रम म्हणून जाहीर केला आहे. हा उपक्रम २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षात राबिवला जाणार आहे. 

या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व शाळांमध्ये  रमेश देव प्रोडकशन प्रस्तुत, अपार एटंरटेन्मेंट निर्मित व रोहित आर्या दिग्दर्शित Let’s Change' हा चित्रपट दाखवला जाणार आहे. जो दर्शकांना एक रंजक आणि त्याचबरोबर ठोस कृतीसाठी प्रोत्साहित करेल. त्यापाठोपाठ होणाऱ्या चर्चा, गटनिय अनुभवांचं आदान–प्रदान, स्पर्धा आणि वेगवेगळ्या ठिकाणी होणारे बक्षिस समारंभ यामुळे जानेवारी २०१७ पर्यंत या उपक्रमाबद्दलचा  उत्साह टिकून राहील असा विश्वास आहे. शाळांवर विशिष्ट वेळाचं / काळाचं बंधन व बोजा न टाकण्याच्याच दृष्टीने आखण्यात आलेला प्रोजेक्ट Let’s Change' सगळ्यांना रंजक आणि उत्सुकतापूर्ण वाटल्याने अतिशय प्रभावी ठरेल व त्याचे दृश्य परिणाम लगेचच दिसतील . 

'स्वच्छ भारत मिशन च्या कमिटीचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनीही हा उपक्रम साधारंजकअतिशय मुलभूत असल्याने अत्यंत प्रभावी ठरेल असं मत व्यक्त केलं आहे. ही एक उत्तम कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तसेच जाहिरातीची संधी ठरू शकते, असं सांगत 'उद्योग जगताने शाळांना पुरस्कृत करावे 'असं आवाहनही केलं आहे. 

तर जेष्ठ अभिनेते रमेश देव म्हणाले  कीहा उपक्रम चित्रपट माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे शालेय स्तरावरच मुलांमध्ये चांगल्या नागरी सवयी रुजतील याचा आम्हाला विश्वास आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थी 'सरदार पटेलबाजीकरत रस्त्यावर व इतरत्र कचरा टाकणाऱ्यांना रोखतील. 'सरदार पटेलबाजीहा 'गांधीगिरी' पेक्षा आतिशय जहाल असा पवित्रा आहे. आमच्या उपक्रमात एकूण ४ टप्पे आहेत आणि प्रत्येक टप्पा अतिशय करमणूकप्रधान अशा चित्रपटाच्या माध्यमातून उलगडून 'स्वच्छ भारत मिशन'च्या यशासाठी मोठा हातभार देईल.

तर प्रकल्प संचालक रोहित आर्या म्हणाले की, प्रोजेक्ट Let’s Change'चा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थाकडून एक माफक शुल्क आकारायला महाराष्ट्र सरकारने आम्हाला परवानगी दिली असली तरी 'एबीसीडीई' (ABCDE)फाऊंडेशन च्या माध्यमातून आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यामागे शुल्क न ठेवता,प्रत्येक शाळेमागे माफक शुल्क आकारण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक विद्यार्थाकडून किती शुल्क घ्यायाचे हा निर्णय शाळेवर सोपविला जाईल. जर शाळेने पैसे जमवले तर दाखवलेल्या चित्रपटाचं सूत्र पकडून, सुचवण्यात आलेल्या उपक्रमांवरच ते शाळेतर्फे खर्च केले जातील. प्रोजेक्ट Let’s Change' अंतर्गत
सर्वोत्तम शाळा, आणि विद्यार्थ्यांचे अभिवादन समारंभपूर्वक विविध ठिकाणी केले जाईल. उद्योगजगताने शाळांना पुरुस्कृत करावं म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. काहींनी त्यात रसही दाखविला आहे आणि आमहाला आशा आहे की आणखी जास्त प्रमाणात इतर कंपन्याही ह्यात रस घेतील, कारण खात्रीने भरपूर प्रसिद्धी तर मिळेलच आणि हा एक प्रभावशाली योग्य (सिएसआर- corporate social responsibility) उपक्रम ही होईल.

तसंच व्यक्तिगत स्तरावरही कुणी आपल्या माजी शाळेला, मुलं जातात त्या शाळेला पुरस्कृत करू शकतील. किंवा किमान या उपक्रमात शाळांना सहभागी करून घेण्यासाठी साहाय्य करू शकतात. या उपक्रमाच्या यशासाठी कचरा इतस्तत: फेकून सारा परिसर गलिछ करण्याच्या घाणेरड्या सवयीला आळा घालण्यासाठीती नियंत्रणात आणण्यासाठी 'एबीसीडीईफाऊंडेशन कंपनीस्वयंसेवी संस्था तसंच वैयक्तिकरित्या यात सहभागी होऊन सामुहिक प्रयत्न करण्याचं आवाहन करत आहे. अधिक माहिती करिता पुढील संकेतस्थळावर'www.letschangeindia.netउपलब्ध आहे. 

No comments:

Post a Comment