Saturday, September 26, 2015

'राजवाडे अँड सन्स' येणार १६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला


प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलेल्या 'हॅपी जर्नी' या सिनेमानंतर लेखक दिग्दर्शक सचिन कुंडलकरचा 'राजवाडे अँड सन्स' हा नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'हॅपी जर्नी' या सिनेमाप्रमाणेच वेगळ्या धाटणीचा आणि नव्या जाणिवांचा हा सिनेमा १६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
पुण्याच्या पार्श्वभूमीवर, एका उद्योजक कुटुंबातील तीन पिढ्यांचं चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. बदलत्या एकत्र  कुटुंब पद्धतीवर हा सिनेमा भाष्य करतो. तसंच आताच्या पिढीची लाइफस्टाइल, त्यांचे व्यावहारिक विचारही हा सिनेमा मांडतो.
सचिन कुंडलकर यांनी सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन केलं आहे. वेगळ्या विषयाची फ्रेश मांडणी,  कलात्मकता जपत व्यावसायिक पद्धतीनं केलेली हाताळणी ही सचिनच्या सिनेमाची खासियत आहे. 'राजवाडे अँड सन्स'मधूनही त्याचा नक्कीच प्रत्यय येईल.
सिनेमात सतीश आळेकर, ज्योती सुभाष, अतुल कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, पौर्णिमा मनोहर, राहुल मेहेंदळे या अनुभवी कलावंतांसह सिद्धार्थ मेनन, आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, कृतिका देव व सुहानी धडफळे या नव्या दमाच्या कलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत . अतुल कुलकर्णी यांच्या 'कॅफे कॅमेरा' या प्रॉडक्शन हाउससह यशवंत देवस्थळी यांनी  सिनेमाची निर्मिती केली आहे

No comments:

Post a Comment