Saturday, May 30, 2015

'साटं लोटं' मध्ये जय-वीरूची केमिस्ट्री




आदिनाथ कोठारे आणि सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा एकत्र

रुपेरी पडद्यावर एखादी जोडी हिट झाली की ती पुन: पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत रहाते. मग ती प्रियकर-प्रेयेसीची असोभाऊ-बहिणीची असोपती-पत्नीची असो वा दोन मित्रांची असो... अशाच दोन मित्रांची जोडी मागील काही दिवसांपासून रूपेरी पडद्याच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर आरूढ झाली आहे. आजच्या तरूणाईचे लाडके अभिनेते असलेले आदिनाथ कोठारे आणि सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांनी दिग्दर्शित केलेला 'साटं लोटं.. पण सगळं खोटंबहुचर्चित सिनेमा ५ जून रोजी प्रदर्शित होत आहे. याच चित्रपटात पुन्हा आदिनाथ-सिद्धार्थची जोडी जमली आहे.

'साटं लोटं.. पण सगळं खोटंया चित्रपटाची कथा तरूण पिढीच्या आजच्या विचारसरणीवर आधारित आहे. यात आदिनाथ आणि सिद्धार्थ मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात आदिनाथचं नाव जय आहेतर सिद्धार्थचं वीरू... जय-वीरू म्हणताच 'शोले'मध्ये अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी साकारलेल्या भूमिका आठवतात. पण हे जय-वीरू त्यांच्यासारखे मुळीच नाहीत. हे जय-वीरू आजच्या तरूणाईचं प्रतिनिधीत्व करणारे आहेत. त्यामुळे या जय-वीरूच्या रूपात आजच्या तरूणाईचं प्रतिबिंब रूपेरी पडद्यावर उमटणार आहे. आदिनाथ- सिद्धार्थ या जोडीला यापूर्वीही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला असल्याने 'साटं लोटं.. पण सगळं खोटं'मधील त्यांचं कामही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 'साटं लोटं.. पण सगळं खोटं'च्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी दिल्याने दोघेही श्रावणी देवधर यांचे आभार मानतात. या चित्रपटात साकारलेला जय-वीरू पाहताना प्रेक्षकांना आमचं एक नवं रूप दिसेलअशी खात्रीही त्यांनी दिली आहे.

'मुव्हिंग पिक्चर्स'ची निर्मिती असलेल्या 'साटं लोटं.. पण सगळं खोटंया चित्रपटात आदीनाथ आणि सिद्धार्थसोबत मकरंद अनासपुरेपुष्कर श्रोत्रीमृण्मयी देशपांडेपूजा सावंत यांसारखे मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत. दिग्दर्शनासोबतच श्रावणी देवधर यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. त्यावर शिरीष लाटकर यांनी पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. कॅमेरामन राहुल जाधव यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं आहे. गीतं श्रीरंग गोडबोले यांनी लिहिली असून सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल श्रृंगारपुरे या आजच्या आघाडीच्या संगीतकार जोडीने 'साटं लोटं.. पण सगळं खोटं'मधील गीतांना स्वरसाज चढवला आहे.


Watch Jay and Veeru's sizzling chemistry in SATALOTA!
Adinath Kothare and Siddarth Chandekar are working together again.

The face of Marathi cinema is undergoing a huge change and to attract the youngsters the subjects of the most of the films are youth-centric. These new age films are going beyond run of the mill subjects like love and friendship and exploring subjects like relationships, emotional bonding and  youngsters outlook towards life . Few years the stories of most Marathi films were written keeping the for middle age audience in mind but now films are being made for the generation next. This change in the outlook of the making of Marathi cinema is a welcome change.

SATALOTA…Pan Sagla Khota presented by Moving Pictures is also a very youthful Marathi film which will release next month. The film is produced by Nitin Tej Ahuja and Ashok Bhushan. Sai Deodhar-Anand and Shakti Anand are co producers of the film. The audience will get to see the inexhaustible energy and enthusiasm of the young generation in the film. The film which is a perfect blend of action, emotion, drama, fun and romance is slated for a release on June 5th.

Along with young actors like Adinath Kothare, Siddharth Chandekar, Mrunmayee Deshpande, Puja Sawant, seasoned actors Makrand Anaspure and Pushkar Shrotri are going to entertain the audience with their brilliant acting and the perfect timing sense. The audience will get to watch the magic of Shravani Deodar’s direction after a long gap in Moving Picture Production’s SATALOTA... pan Sagla Khota. SATALOTA is made in Co-operation with Thought-train Productions. The story of the film is written by director Shravani Deodhar herself and dialogue as well as screenplay is written by Shirish Latkar. The lyrics are penned by Shrirang Godbole and music is composed by Sidharth Mahadevan and Soumil Shringarpure. Rahul Jadhav has done the cinematography of the film. SATALOTA has the entire necessary ingredient to become a hit such as fresh look, meanginful story, and realistic presentation, natural acting of the actors and latest technology and the young generation will surely love the film.


SATALOTA…Pan Sagla Khota which is directed by Shravani Deodhar who is created her own niche in the film industry by making films on different and sensitive subjects will definitely prove to be entertaining film for the audience.

No comments:

Post a Comment