Wednesday, March 4, 2015

'मर्डर मेस्त्री'चा रंगोत्सव


होळी हा रंगांचा सण. हा सण साजरा करण्यात मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही मागे नाहीत. शूटींगच्या व्यस्त शेड्युलमुळे मात्र कलाकारांना सण साजरे करण्याची संधी मिळत नाही. ती संधी 'मर्डर मेस्त्री'च्या टीमला सेटवरच अनुभवायला मिळाली. सेटवरच जोरोशोरोसे रंगाची उधळण करत चित्रपटातील कलाकार-तंत्रज्ञांनी एकच कल्ला केला. वंदना गुप्ते आणि दिलीप प्रभावळकर यांनी यावेळी एकमेकांसोबत रंगोत्सव साजरा केला. 

नाडियादवाला जेननेक्स्ट प्रोडक्शन्स आणि व्हीटीबी एन्टरप्राईझेस प्रस्तुत 'मर्डर मेस्त्री' हा सस्पेन्स कॉमेडी चित्रपट आहे. अब्रार नाडियादवाला आणि वैभव भोर निर्मित राहुल जाधव दिग्दर्शित या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, हृषिकेश जोशी, विकास कदम, संजय खापरे, कमलाकर सातपुते, देवेंद्र भगत, क्रांती रेडकर, मानसी नाईक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जून 2015 मध्ये या चित्रपटातील रहस्य उलगडणार आहे.    

No comments:

Post a Comment