Monday, October 5, 2015

आशियाई चित्रपट महोत्सवात परतु ची बाजी




वेगळ्या धाटणीच्या सत्यकथेवर आधारलेल्या आणि भावनिक मूल्यांचे अनोखे दर्शन घडविणाऱ्या हॉलीवूडच्या 'इस्ट वेस्ट फिल्म्स या नामांकित कंपनीच्या परतु या मराठी चित्रपटाने वॅाशिग्टन मधल्या चौथ्या डी सी साउथ एशियन चित्रपट महोत्सवामध्ये मानाचे पुरस्कार पटकावत आपली मोहोर उमटवली आहे. सशक्त कथाविषय आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर परतु चित्रपटाने हे यश मिळवलंय.

चौथ्या डी सी साउथ एशियन चित्रपट महोत्सवामध्ये नितीन अडसूळ दिग्दर्शित ‘परतु चीच धूम पहायला मिळाली. या चित्रपटाने  सर्वोत्कृष्ट अभिनेता ( किशोर कदम) आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट असे  दोन  महत्त्वाचे पुरस्कार पटकावत आपली ठसठशीत मुद्रा उमटविली.परतु ने विदेशी चित्रपट रसिकांचीही भरघोस दाद मिळवली. विदेशी रसिकांच्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या. एक उच्च निर्मितीमूल्यांचा, चांगल्या आशयाचा सिनेमा पाहिल्याची भावना उपस्थित सर्वच रसिकांनी बोलून दाखवली. आंतरराष्ट्रीय ज्युरीनिवड समितीचे सर्व सदस्य व चित्रपटसृष्टीशी संबधित अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

२५ ते २७ सप्टेंबर यादरम्यान चौथ्या डी सी साउथ एशियन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. २७ तारखेला झालेल्या सांगता समारंभात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जगभरातील वेगवेगळ्या भाषेतील २८ चित्रपट या पुरस्कारांच्या अंतिम शर्यतीत होते. या पुरस्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना नितीन अडसूळ म्हणाले, दिग्दर्शक म्हणून माझ्या चित्रपटाला एवढा मोठा बहुमान मिळावा यापेक्षा दुसरा आनंद असू शकत नाही’. आपल्या मराठमोळ्या  चित्रपट संस्कृतीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्शन घडवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आशियाई चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांचा मन:पूर्वक आभारी आहे. परतु’ या चित्रपटाचे यश हे सर्व "टीम'चे आहेअशी भावना अभिनेता किशोर कदम यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.

 या चित्रपटाची कथा क्लार्क मॅकमिलिअननितीन अडसूळ व डेरेल कॉक्स यांनी लिहिली असून याचे मराठी संवाद लेखन मयुर देवल यांनी केलं आहे. संकलनाची जबाबदारी राजेश राव यांनी सांभाळली आहे. सत्यकथेवर आधारित असलेल्या परतु' चित्रपटात १९६८ ते १९८५ दरम्यानचा काळ रेखाटण्यात आला असून प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचा कथाविषय या निमित्ताने पहाता येणार आहे.

 संजय खानझोडे यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले असून संगीतकार शशांक पोवार यांनी चित्रपटाला संगीताची साथ दिली आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी 'परतु' चित्रपटाचे थीम साँग गायले असून ग्रेग सिम्स या हॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीत संयोजकाने परतु' ला पार्श्वसंगीत दिले आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून नितीन अडसूळसचिन अडसूळरुपेश महाजनडेरेल कॉक्सक्लार्क मॅकमिलिअन हे काम पहात आहेत.
नात्यांमधील अनोखे बंध परतु चित्रपटात पाहायला मिळतात. किशोर कदमस्मिता तांबेसौरभ गोखले,गायत्री सोहमअंशुमन विचारेनवनी परिहारराजा बुंदेला रवी भारतीय आणि बालकलाकार यश पांडे अशा दिग्गज कलाकारांच्या परतु'  सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.   

No comments:

Post a Comment