Friday, August 21, 2015

‘शेगावीचा योगी गजानन’ २८ ऑगस्टला चित्रपटगृहात




जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ असे म्हटले जातेशेगावचे श्री गजानन महाराजही त्यापैकीच एक संत. आजमितीला महाराष्ट्रात गजानन महाराजांचे असंख्य भक्तगण आहेत. या भक्तगणांसाठी निर्माते दीपक गोरे व दिग्दर्शक पितांबर काळे शेगावीचा योगी गजानन हा भक्तीमय चित्रपट घेऊन आले आहेत. कस्तुरी फिल्म प्रोडकशन व नरेश भुतडा प्रस्तुत शेगावीचा योगी गजानन या गजानन महाराजांच्या माहात्म्यावर आधारलेल्या चित्रपटात गजानन लीला पहाता येणार आहे. गजानन विजय’ या गजानन महाराजांच्या चरित्र ग्रंथात भक्तांनी अनुभवलेल्या विविध चमत्कारांचे वर्णन आहे.  या चरित्र ग्रंथाच्या आधारेच हा चित्रपट बनवण्यात आला आहे. २८ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं बहुतेक चित्रीकरण गजानन महाराजांचे वास्तव्य असणाऱ्या अकोला,शेगांवआकोटअडगाव इत्यादी ठिकाणी झाले आहे.

या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या चित्रपटातील सर्व गाणी श्रवणीय आहेत व ती रसिकांना नक्कीच आवडतील असा विश्वास निर्मात्यांनी याप्रसंगी बोलून दाखवला. नाविन्यपूर्ण रचनांचा सुरेल संगम चित्रपटातील गीतांमध्ये अनुभवायला मिळेल.

गीते प्रविण दवणे यांनी शब्दबद्ध केली असून संगीतकार नंदू होनप यांनी या गीतांना संगीतसाज दिला आहे. गायक सुरेश वाडकरअजित कडकडेरवींद्र साठेवैशाली सामंतआदर्श शिंदे यांनी गायिलेल्या भावपूर्ण गीतांमुळे चित्रपटात भक्तीचा सुगंध ख-या अर्थाने दरवळला आहे. चित्रपटात सहा गीते असून गजर करा हे गीत प्रसिद्ध पार्श्वगायक अजित कडकडे यांनी स्वरबद्ध केलं आहे. तर तूही ताज तूही साई  ही भक्तिमय कव्वाली आदर्श शिंदे यांनी गायली आहे. आदर्श शिंदे यांनी कव्वालीचा बाज आणि भक्तिसंगीतात बांधलेले असं गीत पहिल्यांदाच गायलं आहे. ही कव्वाली अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यावर चित्रित करण्यात आली आहे. शेगावीचा योगी गजानन’ हे टायटल साँग सुरेश वाडकर यांनी स्वरबद्ध केलं आहे. राजसा सोडू नका हो हात हे ठसकेबाज गीत वैशाली सामंत हिने नजाकतीने पेश केलं आहे. रवींद्र साठे यांच्या आर्त आवाजातील शेगांव पंढरी आसवात डुबली हे गीतं ही भावपूर्ण झालं आहे. कोरसमधील आरती ही चांगली रंगली आहे.

नितीन नायगावकरांची कथा असणार्‍या या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता अनुप गोरे आहेत. नाना मिसाळ यांचं कलादिग्दर्शन या चित्रपटास लाभलंय् तर सिनेमॅटोग्राफी शिवाजी काळे यांची आहे. गजानन महाराजांची भूमिका नागपूरचे हुरहुन्नरी कलावंत मुकुंद वसुले यांनी साकारली असून या चित्रपटात जॅकी श्रॉफमिलिंद गुणाजीभारत गणेशपुरेसंजय खापरेप्रेमा किरणदिपाली सय्यदपूनम विनेकर आदि कलाकारांच्याही महत्तवपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत. गजानन महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारलेल्या या चित्रपटातून जीवनाचा सकारात्मक पैलू समाजासमोर आणण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. २८ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


--------------------------------------------------------------------------------------------------------------


Shegavicha Yogi Gajanan
Highlighting the spiritual powers of Gajanan Maharaj


 It is said that great Saint’s pray and work unconditionally for the welfare of the world.  Shegaon’s saint Shree Gajanan Maharaj is one of such saints. The great saint is known for rescuing the audience from their trouble. There are hundreds such example in his biography Gajanan Vijay. Many people have received happiness and prosperity due to his blessings.
Even today there are huge numbers of devotees of Shegaon’s Gajanan Maharaj. Producer Deepak Gore and Director Pitambar Kale has made the film ‘Shegavicha Yogi Gajanan’ especially for the devotees of Gajanan Maharaj, presented by Kasturi Film Productions and Naresh Bhutada. 

The audience will get the opportunity to watch the divine powers of  Gajanan Maharaj and how they used them for the benefit of his devotees. There is a detailed description of the miraculous experiences of his devotees in his biography titled as Gajanan Vijay. The film is slated for a release on August 28th and most of the actors in the film hail from Vidharbha region. Most of the film is shot in locations like Akola, Shegaon, Akot, Adgaon et al.

The lyrics of the film are penned by Pravin Davane and music director Nandu Honap has composed the music of the film. The devotional songs are sung by Suresh Wadkar, Ajit Kadkade, Ravindra Sathe, Vaishali Samant, Adarsh Shinde. There are six songs in the film and the song ‘Gajar Kara’ is rendered by noted singer Ajit Kadkade while the devotional qawwali ‘Tuhi Taaj Tuhi Sai’ is sung by Adarsh Shinde. For the first time Adarsh Shinde has a song which is a perfect blend of qawwali style and Bhakti sangeet. This qawaali is picturised on Jackie Shroff. The title song ‘Shegaoncha Yogi Gajanan’ is sung by Suresh Wadkar. The lively song ‘Rajasa Sodu Nako Ha Haath’ is sung by Vaishali Samant in a very animated manner. The song ‘Shegaon Pandhari Aasavat Dubali’ is sung by Ravindra Sathe in his soulful voice. The aarti sung in Korus is also turned out very melodic.

The story of the film is penned by Nitin Naigaonkar. Anup Gore is the executive producer of the film. The art direction is done by Nana Misal and Cinematography is Shivaji Kale. The role of the Gajanan Maharaj is played by Nagpur’s talented actor Mukund Vasule.The star cast of the film comprises of actors Jackie Shroff, Milind Gunaji, Bharat Ganeshpure, Sanjay Khapre, Prema Kiran, Deepali Sayyed, Poonam Vinekar et al. The producer’s aim is to bring the positive aspect of life through this film which is based on the biography of Gajanan Maharaj. The film will be released on August 28th.

No comments:

Post a Comment