Thursday, May 14, 2015

झी टॉकीजतर्फे विनोदवीरांना मानवंदना




रसिकांना मनमुराद हसवून त्यांच्या चेहऱ्यावर निखळ  हास्याची लकेर खुलवणाऱ्या विनोदी कलाकारांना  आजवर नेहमी दुय्यम स्थान देण्यात आलं आहे. हीच बाब हेरत झी टॉकीज वाहिनीने गेल्यावर्षी पासूनप्रेक्षकांना खळखळून हसविणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यासाठी झी टॉकीज कॅामेडी अवॉर्ड्स ची मेजवानी आणली. झी टॉकीज’ वाहिनीतर्फे झी टॉकीज’ कॉमेडी पुरस्कार‘ देऊन या कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यंदाही या पुरस्कार सोहळ्याची रंगत अनुभवायला मिळणार आहे.

मराठी चित्रपटांच्या आणि नाटकांच्या गौरवशाली इतिहासात विनोदी नाटक आणि विनोदी सिनेमा यांचे योगदान नेहमीच मोलाचं ठरलं आहे. हसू फुलविण्याचा अतिशय गंभीरपणे प्रयत्न करणाऱया या अवलियांचा गौरव झी टॉकीज ने गेल्या वर्षी पासून केला होता. चित्रपटनाटकप्रेक्षकांची पसंतीहास्यकवी अशा विविध विभागांमध्ये हे पुरस्कार देण्यात आले होते. तसेच प्रेक्षकांना हसविण्यात आपले आयुष्य वेचणाऱया ज्येष्ठ कलाकारांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. धम्माल विनोदी परफॉर्मन्सेसआकर्षक नृत्याविष्कार आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीने झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सचा पहिलावहिला सोहळा चांगलाच रंगला होता. यंदाही मोठ्या दिमाखात हा सोहळा संपन्न होणार आहे.

मराठी चित्रपटातील विनोदाची ही अभिजात परंपरा जपण्याच्या उद्देशाने "झी टॉकीज वाहिनी ने हा उपक्रम राबवत असल्याचे "झी टॉकीज’ चे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले. झी टॉकीजच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक चित्रपटसृष्टीतील साऱ्याच मान्यवरांनी केले. विनोद हा केवळ कलाकृतीचा भाग न राहता त्याला स्वःताची ओळख मिळावी व मानवी आयुष्याला समृद्ध करणाऱ्या विनोदाचा विनोदवीरांचा योग्य तो सन्मान व्हावा यासाठीच या सोहळ्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या पुरस्कारांसाठी आपल्या कलाकृतींच्या प्रवेशिका 20 मे पर्यंत पाठवता येणार आहेत. प्रवेशिकांचे फॉर्म www.zeetalkies.com/ZTCAया संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

हास्य-विनोदाचा हा जल्लोष झी टॉकीज’ वर लवकरच पाहता येणार आहे. माणसाच्या जगण्यातील हास्याचे क्षण दुर्मीळ होत असताना. कुणी वंदा कुणी निंदा आमचा हसवण्याचा धंदा’ हे सूत्र मनाशी पक्क धरून आजवर अनेक विनोदवीरांनी रसिकांना आनंद दिला आहे. झी टॉकीज वाहिनीच्या या उपक्रमामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या विनोदवीरांचा जोश व उत्साह यामुळे निश्चितच दुणावेल.

No comments:

Post a Comment