Wednesday, April 22, 2015

नितीन देसाईंनी उलगडला कलादिग्दर्शनातला प्रवास






व्ही शांताराम मोशन पिक्चर ट्रस्टचा उपक्रम


मराठी सिनेसृष्टीला सोनेरी दिवस दाखवणाऱ्या चित्रपती डॉ.व्ही शांताराम यांच्या व्ही शांताराममोशन पिक्चर ट्रस्टच्यावतीने युवाव प्रस्थापित चित्रकर्मींसाठी आयोजित केलेल्या सिने कल्चरल सेंटरच्या पहिल्या चर्चासत्राचे पहिलं पुष्प ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गुंफले. 

आपल्या कलादिग्दर्शनाचा प्रवास उलगडताना कराव्या लागणाऱ्या अभ्यासाची व मेहनतीची यशोगाथा त्यांनी मांडली. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटाला मिळालेला कला दिग्दर्शनाचा पुरस्कार हा माझ्यासाठी टर्निग पाँईट ठरला असं सांगत या क्षेत्रात येताना चिकाटी आणि अभ्यासूवृत्ती महत्त्वाची असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

चाणक्य, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या सारख्या मालिकांपासून ते ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लगान’, ‘देवदास’ या सारख्या असंख्य चित्रपटांच्या सेट्सच्या निर्मितीसाठी केलेला तेथील संस्कृती, इतिहास आणि भौगोलिक स्थानांचा अभ्यास, कला दिग्दर्शनाचे बारकावे याच्या चित्रफिती यावेळी दाखवण्यात आल्या, तसेच  सेट्सच्या निर्मितीची प्रात्यक्षिकं त्यांनी याप्रसंगी सादर केली. बी.डी.डी. चाळीपासून सुरु झालेला प्रवास,कला दिग्दर्शन क्षेत्रातला संघर्ष, मातब्बर निर्माता-दिग्दर्शकांची मिळालेली साथ, मिळालेला मान-सन्मान, पारितोषिक आणि भविष्यातील योजना याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

सांस्कृतिक कार्यसंचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे यांनी दिपप्रज्वलन केले. या उपक्रमाचे संकल्पनाकार हर्षल बांदिवडेकर यांनी प्रास्ताविक केलं तर सूत्रसंचालन अमित भंडारी यांनी केलं. व्ही शांताराम मोशन पिक्चर ट्रस्टच्या या उपक्रमाची झालेली दमदार सुरुवात प्रस्थापित व युवा चित्रकर्मींसाठी मार्गदर्शक ठरेल अशी भावना उपस्थित चित्रकर्मींनी बोलून दाखवली. श्री. किरण शांताराम यांनी नितीन देसाई यांचे आभार व्यक्त केले. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी या उपक्रमाचे कौतुक करतअसे उपक्रम सातत्याने व्हायला हवेत असे आवर्जून नमूद केले.

No comments:

Post a Comment