Wednesday, May 23, 2018

सद्सद्विवेक बुद्धीला साद घालणारा राष्ट्रीय लघुचित्रपट 'मयत'



प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा पापमार्गाने  जाता अंतर्मुख होऊन स्वतःमध्ये असलेल्या सद्सद्विवेक बुद्धीला साद घातलीतर जगण्याचा नवा पर्याय उपलब्ध होऊ शकतो असा संदेश डॉसुयश शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला 'मयतहा लघुपट देऊन जातो.अलीकडेच 'मयतलघुपटाला ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून गौरविण्यात आले आहेत्याचप्रमाणेजयपूर फिल्म फेस्टिवल मध्ये देखील  इंटरनॅशनल पॅनोरमा विभागात सादर होणाऱ्या चित्रपटांमध्ये 'मयतलघुपटाला सर्वोत्कृष्टस्क्रिप्टचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.  

ही कथा आहे एका खेड्यात मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या नामदेव याचीमोलमजुरी करण्यासाठी अनेकठिकाणी चकरा मारूनही त्याला काम मिळत नाहीघरात खायला अन्नाचा कण नाहीअशा परिस्थितीत त्याला मयताच्याअंतयात्रेच्यावेळी टाकण्यात येणारे पैसे गोळा करण्यातून उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त होतेअशी वेगळे कथाबीज घेऊन डॉसुयश शिंदेयांनी ही कथा पडद्यावर फुलवली आहे

या लघुचित्रपटाबद्दल बोलताना डॉसुयश शिंदे म्हणाले, "'मयतलघुप हा पूर्णपणे व्यावसायिक सेटअप वापरून तयार केलेला आहे.जवळपास दीड वर्षांपासून 'मयतलघुपटावर काम चालू होतेसर्वसाधारणपणे कोणताही लघुचित्रपट तत्कालीन समस्येवर सामाजिकसंदेश देतोत्यामधून लोकजागृती करणे हा उद्देश असतोमात्र या संकल्पनेला छेद देत मी प्रेक्षकांना माझ्या चित्रपटातून तात्विकसंदेश देण्याचे ठरवलेत्यामुळे 'मयतहा लघुपट प्रेक्षकांना अंतर्मुख करून जगण्याचे तत्वज्ञान देण्याचा प्रयत्न करतो.या लघुचित्रपटाच्या स्क्रिप्टवर पाच-सहा महिने काम चालू होतेया लघुचित्रपटाच्या लोकेशनसाठी सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणीप्रवास करून चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारी लोकेशन निवडण्यात आलीकॅमेरामन गिरीश जांभळीकर यांनी प्रत्येकलोकेशनला आपल्या फ्रेममध्ये सुंदर रीतीने दाखवल्यामुळे छायाचित्रणातूनही लघुप व्यक्त होतोइतर तांत्रिक बाजूसंभाळणाऱ्यांमध्ये विपुल कदम (संकलन), सायली कुलकर्णी (ध्वनी), संगीत (गंधारयांच्या कामगिरीने चित्रपट प्रेक्षकांना खिळवूनठेवतो.  या लघुपटाचे सलग सहा दिवस चित्रीकरण सुरु होतेचित्रीकरणासाठी स्थानिक गावकऱ्यांनी देखील खूप सहकार्य केले.त्यानंतर पोस्ट प्रॉडक्शनची तीन ते चार महिने लागलेया सगळ्या टीमने केलेल्या कष्टाचे फळ मिळाले असल्याचे डॉशिंदे यांनीनमूद केले

डॉसुयश शिंदे यांनी हा लघुचित्रपट अतिशय सुरेख दिग्दर्शित केला आहेकाही दृष्यामधून त्यांच्यातील कल्पक दिग्दर्शक दिसूनयेतोनामदेवची भूमिका केलेल्या कैलास वाघमारे यांनी आपल्या भावमुद्रेवरून ही भूमिका जिवंत केली आहेमीनाक्षी राठोड यांनीत्याच्या पत्नीची भूमिका समरसून केली आहेइतर भूमिकांमध्ये नामदेवची मुलगी (सुरभीआणि अन्य कलाकारांनी उत्तम साथदिली आहेलघुचित्रपटाचा प्रत्येक कॅनव्हास लक्षवेधी झालेला आहे


राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेला दिग्दर्शक डॉसुयश शिंदे यांचा हा सलग तिसरा लघुचित्रपट.  यापूर्वी २०१६ मध्ये स्वच्छ भारत फिल्मफेस्टिवलमध्ये देशभरातून  मिनिटांचे लघुचित्रपट मागविण्यात आले होते४५०० चित्रपटांमधून डॉशिंदे यांनी तयार केलेल्या'शेल्फीया लघुचित्रपटाला तिसरा क्रमांक मिळाला होता२०१७ मध्ये केंद्रीय सामाजिक न्याय  कल्याण खात्याने दिव्यांगजनसशक्तीकरण फिल्म फेस्टिवल आयोजित केला होतात्यामध्ये डॉसुयश शिंदे यांनी तयार केलेल्या 'अजानलघुचित्रपटाला प्रथमक्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले होतेआणि आता २०१८ मध्ये 'मयतचित्रपटाला ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्टलघुचित्रपट म्हणून गौरविण्यात आले आहे

डॉसुयश शिंदे हे व्यवसायाने दंतवैद्य असून ते मूळचे सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील चौधरवाडी गावचेत्यांना अभिनयआणि दिग्दर्शनाची आवड असून पुण्यात वैद्यकीय शिक्षणासाठी महाविद्यालयात असताना पुरुषोत्तम करंडकसकाळ करंडक अशाएकांकिका स्पर्धेतून त्यांनी भाग घेतला आहेडॉशिंदे यांनी 'देऊळया मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्याबरोबरकाम केले आहेआगामी काळात एक डार्क कॉमेडी असलेला लघुचित्रपट बनविण्याचा डॉशिंदे यांचा मानस आहे.  

No comments:

Post a Comment