Tuesday, February 14, 2017

प्रत्येक नात्यामधला प्रेमाचा गोडवा जपणं हाच व्हॅलेंटाइन डे - अभिजीत खांडकेकर



प्रेमिकांसाठी महत्वाचा असलेला दिवस म्हणजे १४ फेब्रुवारी. आपल्याला आवडणारी कलाकार मंडळी व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी काय करतातहा दिवस कसा साजरा करणारअसे अनेक प्रश्न कलाकरांच्या चाहत्यांमध्ये निर्माण होतात. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या चाहत्यांसाठीही त्याच्या व्हॅलेंटाइन डे विषयी कुतूहल नक्कीच असेल. अभिजीतला या दिवसाविषयी काय वाटते? यंदाचाव्हॅलेंटाइन तो कसा साजरा करणार? हे आम्ही त्याच्याकडूनच जाणून घेतलं.

व्हॅलेंटाइन डे विषयी तुझं काय मत आहे?
सध्या चांगुलपणा हरवत चालला आहे. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने सर्वांशी आपुलकी व प्रेमाने वागत प्रेमाचा, आपलेपणाचा गोड संदेश आपण सगळ्यांना द्यायला हवा असं मला वाटतं. हा दिवस फक्त कपल्सनेचसेलिब्रेट करावा असं नाही तर प्रत्येक नात्यामधला प्रेमाचा गोडवा वाढावा यासाठी या दिवसाचं औचित्य साधायला हवं.
यंदाचा व्हॅलेंटाइन डे तू कशाप्रकारे साजरा करणार?

आमच्या लग्नाचा वाढदिवस १ फेब्रुवारीला असल्याने १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी आम्ही व्हॅलेंटाइन वीक सेलिब्रेट करतो. यंदा कामाचं व्यस्त शेड्यूल असल्यामुळे हटके काहीतरी करणं शक्य नसलं तरी एक छानसं प्लेझंट सरप्राईज सुखदाला देणार आहे.
तुझ्या लक्षात राहिलेली व्हॅलेंटाइन डेची एखादी गोड आठवण सांग?

गेल्यावर्षी मी सुखदासाठी स्वत:च्या हाताने स्वयंपाक बनवला होता; तो कितपत चांगला झाला ते माहित नाही पण सुखदासाठी तो एक सुखद धक्का होता. तसचं एका व्हॅलेंटाइन डेला आम्ही गेट ऑफ इंडियाला फिरायला गेलो होतो तेथे मी सुखदासाठी एक यॉर्ट बुक केली होती. अथांग समुद्राचं आणि सुर्यास्ताचं विहंगम दृश्य मनात साठवत आम्ही हा दिवस साजरा केला होता. ५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत व सचिन कटारनवरे निर्मितभय या माझ्या आगामी चित्रपटातील एक रोमँटिक गीत आम्ही क्रुझवर चित्रीत केलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने आम्ही सेलिब्रेट केलेल्यारोमँटिक डेटच्या आठवणीला पुन्हा उजाळा मिळाला.  

No comments:

Post a Comment