Thursday, May 14, 2015

प्रेमाचं नातं उलगडून दाखवणारा ‘अप'




 कार्ल आणि एलीची साहसी प्रेमकथा रेखाटणाऱ्या 'अपया अॅनिमेटेड फिल्मची खास झलक लवकरच तुम्हाला झी टॉकीजवर अनुभवता येणार आहे.
कार्लएली आणि रसल या तिघांच्या मैत्रीचीप्रेमाची ही कथा आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या कार्ल आणि एलीने लग्न करून आपली वेगळीच दुनिया उभारली आहे. परिस्थितीशी जुळवून घेत एकमेकांच्या आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न करणारे हे जोडपं पॅराडाईस  वॅाटर फॉलला सहलीवर जाण्याचा निर्णय घेतात.
अचानक वयोवृद्ध एली अल्पशा आजाराने कार्लला सोडून देवाघरी जाते. आपल्या पत्नीच्या आठवणींनी कार्ल एकटा पडतो. त्या घराशी त्याच्या आणि एलीच्या खूप आठवणी जोडल्या गेल्या असल्यामुळे कार्लला ते घर सोडायचे नाहीये. कार्लला ती आपल्यासोबत घरातच असल्याचा भास होत असतानाच स्काउट मधला मेरीट ब‌ॅच मिळवण्यासाठी वृद्धांना मदत करण्याकरिता रसल हा आठ वर्षाचा छोटा मुलगा त्याच्या आयुष्यात येतो. त्यातच कार्लच्या घराशेजारीच कन्सस्ट्रक्शन चालू झाल्याने कार्लला आपले घर सोडावं लागण्याची शक्यता आहे. आपल्या पत्नीला दिलेले सहलीचे वचन पूर्ण करण्यासाठी कार्ल राहते घरच साऊथ अमेरिकेच्या पॅराडाईस वॅाटर फॉल दिशेने उडवून नेतो हवेत उडवून नेण्यासाठी कार्ल हेलियमच्या फुग्यांचा आधार घेतो आणि रसल त्याला मदत करतो. फुग्यांच्या आधारे हवेच्या दाबाने घर वेगळ्याच ठिकाणी भरकटत जातं. कार्ल आपल्या पत्नीचे स्वप्न पूर्ण करू शकतो का…? रसलला कार्ल सुरक्षित पॅराडाईस वॅाटरफॉलवर उतरवतो का… या साऱ्याची चित्तथरारक गोष्ट म्हणजे 'अप' लहानांसोबत-मोठ्यांनाही गुंतवून ठेवणारा 'अप या चित्रपटाचा आस्वाद येत्या रविवारी १७ मे ला दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता ‘झी टॉकीज’वर घेता येईल.  
झी टॉकीज महाराष्ट्रातील मराठी चित्रपट रसिकांची खास जिव्हाळ्याची चित्रपट वाहिनी असून गेल्या काही वर्षातच या वाहिनीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मराठी चित्रपटांचा मूल्यवान खजिना झी टॉकीज वाहिनीने जपला आहे. या चित्रपटांना रसिकांनी नेहमीच उत्तम प्रतिसाद दिला आहे. रसिकांनी दिलेल्या या भरभरून प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना झी टॉकीज ने मनोरंजनाचे अनोखे नजराणे पेश केले आहेत. झी टॉकीजच्या या नित्य नव्या प्रयत्नांना रसिकांनीही खूप उचलून धरले आणि म्हणूनच मनोरंजनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी झी टॉकीजला सतत प्रोत्साहन मिळत आले. याच उत्साहातून अनेक गाजलेले चित्रपटअनेक क्लासिक चित्रपटांचे महोत्सवकॉमेडी चित्रपटांची जत्रा यासोबतच सिनेताऱ्यांच्या भेटी किंवा चित्रसृष्टीचे दैदीप्यमान सोहळे रसिकांना घरबसल्या अनुभवता आले.
वैविध्यपूर्ण मनोरंजनाची ही वैभवशाली परंपरा जोपासत झी टॉकीज या सुट्टीत आपल्या छोट्या दोस्तांसाठी एक खास आश्चर्यकारक भेट घेऊन दाखल होतेय. अॅनिमेशन चित्रपटांची ही जादुई दुनिया केवळ छोट्या मित्रांसाठीच नव्हे तर कुटूंबातल्या प्रत्येकासाठी आनंदाची पर्वणी ठरली आहे. मनोरंजनाचा हा आगळा वेगळा धमाका झी टॉकीजच्या आजवरच्या प्रवासातला आणखी एक परमोच्च बिंदू ठरेल अशी आशा आहे. असे झी टॉकीज चे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले.
डिस्ने आणि डिस्ने पिक्सार चे चित्रपट प्रादेशिक भाषांमध्ये मोठ्याप्रमाणात वितरीत करण्यासठी डिस्ने आणि डिस्ने पिक्सार ने नेहमीच पुढाकार घेतला आहे. डिस्ने मिडिया डिस्ट्रीब्युसन ने आजवर आपले सर्वाधिक कार्यक्रम वेगवेगळ्या  भाषांमध्ये प्रसारित केले आहेत. डिस्ने मिडिया डिस्ट्रीब्युसन चे १३,००० प्लॅटफॉर्म पार्टनर २४० प्रभागात हे कार्यक्रम जगभरात प्रसारित करतात.डिस्ने मिडिया डिस्ट्रीब्युसन भारतातल्या वेगवेगळ्या वाहिन्यांबरोबर काम करते.

No comments:

Post a Comment