Tuesday, April 28, 2015

'लक्ष्य': मराठी टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळ चालणारी क्राईम-थ्रिलर मालिका



गुरुवार - रविवार रात्री १० वाजता

मुंबई, २४ एप्रिल २०१५ :समाजातील गुन्हेगारी  आणि वाईट प्रवृत्तीवर भाष्य करीत आपल्या

प्रेक्षकांना सतर्क करणारी  स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका,  'लक्ष्य'ने  नुकताच ७०० एपिसोड

प्रसारित करण्याचा उच्चांक गाठला आहे.  प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असताना सामाजिकतेचे भान

राखणारी 'लक्ष्य ही मालिका मराठी टेलिव्हिजन विश्वातील सर्वाधिक काळ चालणारी क्राईम-थ्रिलर

मालिका आहे. आपली आवडती 'लक्ष्य' मालिका  आता नव्या स्वरुपात सादर होत आहे. या

निमित्ताने मराठी क्राईम-थ्रिलर मालिकेच्या सादरीकरणात एक अभिनव प्रयोग होत आहे.

युनिट आठ द्वारे सामान्य लोकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याऱ्या एसीपी अभय

किर्तीकर, इन्स्पेक्टर रेणुका राठोड , सुर्यकांत भोसले , यशोधन, सब इन्स्पेक्टर  दिशा,प्रेरणा,

विरेन्द्र कदम, कॉन्स्टेबल केशव, मारुती जगदाळे  ही  सगळीच पात्रे प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय

आहेत. आता हीच पात्रे प्रेक्षकांशी संवाद साधून  त्यांनी सोडविलेल्या केसेस प्रेक्षकांना  उलगडून

दाखविणार आहेत. या मालिकेद्वारे  पोलिसांची  आव्हानात्मक कामगिरी तर  दाखविण्यात

आली  आहेच पण आता  सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलिसांच्या  कौटुंबिक

आयुष्याची झलक  देखील दाखविण्यात येणार आहे.

या प्रसंगी बोलताना स्टार इंडियाचे प्रवक्ते म्हणाले की, "लक्ष्य सारख्या क्राईम-थ्रिलर मालिकेचे

७०० एपिसोड्स पूर्ण होत असताना आम्हाला अभिमान वाटतोय की या मालिकेद्वारे आम्ही

पोलिसांचा सकारात्मक आणि मानवी चेहरा समोर आणू  शकलो. या मालिकेतील पोलिस

अधिकाऱ्यांना आपण अनेक गुन्हे सोडविताना पाहिले आहेच, पण पोलिस  असे आव्हानात्मक

काम करताना आपल्या कौटुंबिक आयुष्य कसे जगतात याची झलक आपल्याला बघायला

मिळणार आहे. आम्हाला खात्री आहे की, दर्शकांना पोलिसांची ही बाजू देखील पाहायला नक्कीच

आवडेल.”

या मालिकेतील एसीपी अभय किर्तीकर ही  भूमिका साकारणारे  अशोक समर्थ  लक्ष्य टीमच्या

वतीने  म्हणाले  की, “एसीपी अभय किर्तीकर ही भूमिका तर मी मनापासून एन्जॉय तर केलीच

पण या मालिकेद्वारे पोलिसांचा गणवेष परिधान केल्यावर ती जबाबदारी देखील  यानिमित्ताने

आम्हाला अनुभवायला मिळाली. यातील  भूमिका आमच्या सगळ्यांच्याच कारकिर्दीतील एक

संस्मरणीय भूमिका आहे. या मालिकेतील स्पॉटबॉय ते दिग्दर्शक आणि लेखक ते कलाकार या

सगळ्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आज आम्ही हे यश मिळवू शकलो.”

पाहायला विसरू नका, लक्ष्य- गुरुवार-रविवार रात्री १०वाजता

फक्त स्टार प्रवाह वर

No comments:

Post a Comment