Thursday, March 26, 2015

'Timepass 2' Music Launch

  














पुण्याच्या कला-क्रिडा संकुलात "टाईमपास २" चा म्युझिक लाँच" सोहळासुध्दा दिमाखात पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत हा म्युझिक लॉंच चा सोहळा संपन्न झाला. 'नटरंग', 'बालक-पालक' यासारखे दर्जेदार आणि वेगया धाटणीचे चित्रपट देणार्या दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'टाइमपास' या चित्रपटाने चित्रपटसृष्टित एक नवा अध्याय सुरु केला आहे. टाइमपास मधील देखणी जोडी केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब यांच्या नितांत सुंदरयानंतर 'टाइमपास २ ' मध्ये त्यांच्या तरुणपणीचा रोल कोण करणार याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण करण्यात आली होती. पण आता ही उसुकता संपली आहे. एस्सेल व्हिजन आणि अथांश कम्युनिकेशन निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास २' हा सिनेमा १ मे २०१५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
             यावेळी मराठी-हिंदीतील अनेक कलाकारांनी आपले परफॉमंस सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी 'टाइमपास' ची जोडी केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब तसेच 'टाइमपास २' चा मोठ्या दगडुची व्यक्तिरेखा साकारणारा प्रियदर्शन जाधव यांचे परफॉमंस हे मुख्य आकर्षण ठरले. 'फुल्ल2टाइमपास' या कार्यक्रमाची सुरुवात प्रसिध्द अभिनेत्री आणि नृत्यांगना उर्मिला कानेटकरच्या नृत्याने झाली. पंचतुंड नररुंडमालधर आणि नटरंग या गायांवर तिने सादर केलेया नृत्याने सारे सभागृह मंत्रमुग्ध झाले. यानंतर स्वप्निल बांदोडकरने 'मला वेड लागले प्रेमाचे' गाऊन पुन्हा एकदा रसिकांच्या मनावर आपल्या सुरेल स्वरांची मोहनी घातली. टाईमपास मधील जोडी प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर अभिनयाबरोबरच सुंदर नृत्यही करतात. यांनी 'फुलपाखरु आणि कल्ला' या गीतांवर नृत्य सादर केले. प्रेक्षकांनीही त्यांना भरभरून दाद दली. अभिनेत्री अमृता खानविलकर 'शिट्टी वाजली' या गीतावर नृत्य सादर करत संपूण सभागृहाला थिरकायला लावले.
           यानंतर 'टाईमपास२' या सिनेमाच्य म्युझिक लॉंचचा सोहळा पार पडला. दिग्दर्शक रवी जाधव, केणी, यांच्या हस्ते 'टाईमपास२' च्या म्युझिक सीडिचे अनावरण करयात आले. या कार्यक्रमात सगळ्यात आकर्षण ठरला तो 'टाईमपास२' चा 'हिरो', सगळ्यांचा लाडका दगडू, म्हणजेच प्रियदर्शन जाधव याचा परफॉमंस. पेपरविक्या दगडूचा आता डॅशिंग 'रॉकी' झाला आहे. नवा दगडू "रॉक' म्हणजेच प्रियदर्शन जाधवच्या 'वॉव वॉव' या नृयाने एकाच धमाल उडवून दली. 'टाईमपास' प्रमाणेच 'टाईमपास२ मधील गाणीही अत्यंत श्रवणीय आहेत. बेला शेंडे, महालक्षमी अय्यर, शाल्मली खोलगडे, अपेक्षा दांडेकर, आदर्श शिंदे यांनी गायलेल्या सुमधुर गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. सोनाली कुलकर्णी हिच्या मदन पचकारी आणि नवीन ही पोळी साजूक तुपातली या तुफान नृत्याने संपूर्ण प्रेक्षकांना थिरकायला लावले. या सोहळ्याचे प्रक्षेपण ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता झी टॉकज वर होईल.

No comments:

Post a Comment