Sunday, March 15, 2015

Chaitra Chahul 2015

'चैत्र चाहूल २०१५: नव्या नात्यांची नवी गुढी' - मराठमोळ्या मनोरंजनाचा खास सोहळा

२१ मार्च २०१५ रोजी रात्री ८ वाजता









मुंबई, १२ मार्च २०१५ : गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा ! मराठी नववर्षाची सुरुवात. मराठी

संस्कृतीचा एक अविभाज्य भाग. नूतनवर्षाच्या आगमनाचा  आनंद द्विगुणित  करण्यासाठी

नववर्षाच्या संध्याकाळी स्टार प्रवाह वाहिनी मनोरंजनाचा एक अभूतपूर्व सोहळा आपल्या

प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. वैभवशाली मराठी संस्कृतीचे भव्य-दिव्य दर्शन स्टार प्रवाहाचे

कलाकार 'चैत्र चाहूल २०१५: नव्या नात्यांची नवी गुढी ' या कार्यक्रमातून आपल्या प्रेक्षकांना

घडविणार आहेत. २१ मार्च २०१५ रोजी रात्री ८ वाजता हा स्टार प्रवाह वाहिनीवर कार्यक्रम

प्रसारित होणार आहे.

'चैत्र चाहूल २०१५' म्हणजे मराठी टेलिव्हिजनवरील  मराठमोळ्या मनोरंजनाचा आजपर्यंतचा

सर्वात मोठा सोहळा. गुढीपाडव्याची सकाळ तर आपण आपल्या नातेवाईकांसोबत साजरी करतोच

पण या वर्षी  स्टार प्रवाहवरील  मराठी नववर्षाची संध्याकाळ असेल काही खास.  काय आहे  या

सोहळ्यात? ढोल ताशाचा गजर……भोंडल्याचा सामुहिक नाद…लावणीची  छुमछुम……..नाट्यसंगीताचे

सूर !  प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल अशा   महाराष्ट्राच्या   सांस्कृतिक परंपरेचे  

भव्य दर्शन . गतकाळाच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देणारा, भूपाळी पासून भैरवी पर्यंतचा

प्रवास. संस्कृती आणि प्रगतीची सांगड घालणारे मनोरंजनाचे नाविन्यपूर्ण  अविष्कार प्रेक्षकांना

मंत्रमुग्ध करतील.

'चैत्र चाहूल २०१५ ' या कार्यक्रमाचे हे पहिले वर्ष ! याच कार्यक्रमात अजून एक महत्वाची सुरुवात

म्हणजे 'प्रवाह रत्न' पुरस्कार. नाट्य,चित्रपट, टेलिव्हिजन ,पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी

अशा  वेगवेगळ्या प्रवाहामध्ये लख्खं  चमकणाऱ्या रत्नांना  हा सन्मान या वर्षीपासून दिला

जाणार आहे. हा अशा मान्यवरांचा सन्मान आहे ज्यांनी आपल्या कर्तुत्वाची गुढी इतकी उंच नेली

आहे की वर पाहताना आपला उर अभिमानाने भरून येतो.

या प्रसंगी बोलताना स्टार प्रवाहचे प्रोग्रामिंग हेड  जयेश पाटील म्हणाले की, “चैत्र चाहूल २०१५

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही अनेक नवीन उपक्रमांची  सुरुवात करीत आहोत. हा कार्यक्रम

बघितल्यावर प्रत्येक मराठी माणसाला आपल्या संस्कृतीचा आणि मराठी असण्याचा अभिमान

वाटेल याची आम्हाला खात्री आहे."

महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपण्यामध्ये चित्रपट, टेलिव्हिजन या क्षेत्रातील अनेक कलाकारांनी

भरीव योगदान दिले आहे. या आणि इतर क्षेत्रातील प्रथितयश मान्यवरांची  उपस्थिती हे स्टार

प्रवाह आणि चैत्र चाहूल २०१५ या कार्यक्रमाचे यशच म्हणावे लागेल.  वैभवशाली मराठी संस्कृतीने

नटलेला हा कार्यक्रम सादर करताना  स्टार प्रवाह वाहिनीला आणि कलाकारांना त्याचा अतिशय

अभिमान आहेच पण हा कार्यक्रम बघताना तेवढाच अभिमान  प्रेक्षकांना देखील नक्कीच  वाटेल !

सहकुटुंब, सहपरिवार पाहायला विसरू नका !

‘चैत्र चाहूल २०१५: नव्या नात्यांची नवी गुढी’

२१ मार्च २०१५ रोजी रात्री ८ वाजता

फक्त स्टार प्रवाहवर

No comments:

Post a Comment