Sunday, November 16, 2014

MADHYAMVARG The Middle Class.. Music Release




गरीब आणि श्रीमंत या दोन वर्गांना जोडणारा समाजातला मोठा वर्ग म्हणजे 'मध्यमवर्ग'. समाजात घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींची पहिली झळ नेहमीच या मध्यमवर्गाला सोसावी लागते. समाजात जगताना पदोपदी नशिबी येणारी हतबलता सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला बंड करायला प्रेरित करतेय मग तो भ्रष्टाचार असो वा स्त्रियांवरील अत्याचार... मध्यमवर्गीयांची ही असामान्य लढाई मनात आणले तर क्रांतीची नवी पहाट आणू शकते, याच कथा विषयावर भाष्य करणारा 'मध्यमवर्ग THE MIDDLE CLASS' हा मराठी चित्रपट येतोय. 'वसन आर्ट्स मिडीया प्रा.लि.'  आणि 'सी. पी. आय. मुव्हीज' चे सुजित तिवारी निर्मित या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन हॅरी फर्नांडिस यांनी केलंय. हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येतोय तत्पूर्वी यातील सुरेल गीतांची ध्वनिफीत कलाकार- तंत्रज्ञांच्या उपस्थितीत नुकतीच प्रकाशित करण्यात आली.  

निर्मात्या श्रीमती लक्ष्मी बाबाजी आंजर्लेकर संजय गोपाळ छाब्रिया यांच्या 'मध्यमवर्ग THE MIDDLE CLASS' चित्रपटाचे आकर्षण म्हणजे असंख्य मालिका आणि सिनेमांमधून लोकप्रिय ठरलेले सुपरस्टार रवि किशन प्रथमच या मराठी चित्रपटामधून मुख्य भूमिकेत प्रेक्षकांसमोर येताहेत. गीतकार बाबासाहेब सौदागर, सावता गवळी, हॅरी फर्नांडिस लिखित यातील पाच गीतांना संगीतकार गुणवंत सेन यांनी संगीत दिलंय. यातील 'कोंबड्याने बाग' हे गीत बप्पी लहरी, कल्पना यांनी गायलं असून 'परिवार' हे गीत गायकांसोबत कलाकारांच्या ही आवाजात स्वरबद्ध करण्यात आलंय. हे गीत स्वप्नील बांदोडकर, पी. गणेश, नयना आपटे, अनुपमा शर्मा, वैशाली डे, सुप्रिया पाठक यांनी गायलं आहे.'नशिबाचा खेळ' या गीताला शान आणि प्रिया भट्टाचार्य यांचा सुमधूर स्वर लाभला आहे. यातील 'नऊवारी साडी' या दिलखेचक गीताला वैशाली सामंत यांचा आवाज असून अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यावर ते चित्रीत करण्यात आले आहे. यातील 'झाले शहीद' या देशभक्तीपर गीताला रुपकुमार राठोड, साधना सरगम यांनी गायले आहे. या चित्रपटासाठी पार्श्वसंगीत सलील अमृते यांनी दिले असूनएम. जी. आर.’ म्युझिक कंपनीच्यावतीने 'मध्यमवर्ग'ची ध्वनिफीत प्रकाशित करण्यात आली आहे.  


रवि किशन, सिद्धार्थ जाधव, अनंत जोग, नयना आपटे, सुजाता जोशी , कश्मिरा कुलकर्णी, हेमांगी काझ , किशोर नांदलस्कर, वसंत आंजर्लेकर, रमेश वाणी, अनिल गवस, अॅलन फर्नांडिस, तन्वी मेहता राज खत्री आदी नामवंत कलाकारांच्या यात भूमिका आहेत. छायांकन शफीक शेख यांनी केलं असून नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव, राजेश बिडवे, रामदेवन, रेश्मा खान यांनी केले आहे. वसंत बाबाजी आंजर्लेकर हे चित्रपटाचे सूत्रधार असून,' मध्यमवर्गीयांनी एक व्हा' हा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. येत्या १२ डिसेंबरला 'मध्यमवर्ग THE MIDDLE CLASS' चित्रपट प्रदर्शित होतोय, त्याआधी प्रकाशित झालेली यातील गीते प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरतील.  

No comments:

Post a Comment