Wednesday, October 22, 2014

Star Pravah & Thane Traffic Police " Road Safety Campaign ".

मुंबई, २१ ऑक्टोबर २०१४ : दिवाळीचा सण म्हणजे आनंद आणि उत्साह. सणासुदीच्या या

उत्साहाच्या दिवसात वर्षभरात राहून गेलेल्या आपल्या प्रियजनांच्या भेटीगाठी उरकण्याची

धावपळ सुरु होते. वाहतुक विभागाच्या अभ्यासानुसार सणासुदीच्या दिवसात अपघाताचे प्रमाण वाढते.

याच पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून ठाणे वाहतूक विभागाने लोकजागृतीसाठी स्टार

प्रवाह वहिनीबरोबर अभिनव पद्धतीने " वाहतुक सुरक्षा अभियान " सुरु केले आहे . स्टार प्रवाह

वाहिनीवरील लक्ष्य या लोकप्रिय मालिकेतील कलाकार या अभियानाचे ब्रान्ड अम्बेसिडर (सदिच्छा

दुत ) असतील. या अभियाना अंतर्गत लोकजनजागृती व्यतिरिक्त ठाणे प्रादेशिक विभागातील

वाहतुकीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक हेल्पलाईन तयार करण्यात आली आहे. हे

कलाकार वाहतुक सुरक्षेचे नियम पाळण्याचे आवाहन करणार आहेत .

वाहतुक सुरक्षा अभियानाअंतर्गत ठाणे वाहतूक विभागाने ८२८६३००३०० आणि ८२८६४००४०० हे दोन

हेल्पलाईन क्रमांक वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी उभारले आहेत. रस्त्यावरील अपघात

किंवा वाहतुकीची समस्या आल्यास या क्रमांकावर फोन करून वाहतूक पोलिसांची मदत त्वरित

मिळवता येईल. या व्यतिरिक्त स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्य या मालिकेतील युनिट आठ

चे कलाकार "मद्यपान करून गाडी चालवू नका ", "दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करा" आणि

 "वेगमर्यादेचे पालन करा " हे संदेश विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोचविणार आहेत. ठाणे प्रादेशिक

विभागातील ठाणे, कल्याण डोंबिवली आणि भिवंडीतील मॉल्स आणि मोक्याच्या' ठिकाणी होर्डिंग ,

फलक, इत्यादी लावले जाणार आहेत आणि पत्रके देखील वाटण्यात येणार आहेत .

या प्रसंगी बोलताना ठाणे वाहतुक विभागाच्या पोलिस उपायुक्त डॉ रश्मी करंदीकर म्हणाल्या कि, "

सामान्यांची वाहतूक सुरक्षा हा आमचा नेहमीच अग्रक्रम राहिला आहे. म्हणूनच ठाणे वाहतूक

विभाग जन जागृतीसाठी नेहमीच अभिनव योजना आखत असते. पोलिसांच्या कामगिरीचे प्रभावी

चित्रण दाखवणारी स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्य हि मालिका खूपच लोकप्रिय आहे. त्यामुळे

ब्रान्ड अम्बेसिडर (सदिच्छा दुत ) म्हणून लक्ष्य मालिकेचे कलाकार आमची निर्विवाद निवड

होती. "

तसेच स्टार प्रवाह वाहिनीचे . प्रोग्रामिंग हेड जयेश पाटील या प्रसंगी बोलताना म्हणाले की, "

आमच्या वाहिनीने लक्ष्य आणि जयोस्तुते सारख्या मालिकांमधून पोलिसांचा आणि कायद्याचा

सकारात्मक चेहरा प्रेक्षकांसमोर आणला आहे. एक जबाबदार वाहिनी म्हणून रस्ता सुरक्षा

अभियानाचे महत्वदेखील आम्ही जाणतो. या अभियानातील सहभागामुळे वाहिनीच्या शिरपेचात

अजून एक मानाचा तुरा खोचला गेला आहे. यापुढेदेखील स्टार प्रवाह वाहिनी अधिकाधिक वाहतुक

सुरक्षेच्या उपक्रमात सहभागी असेल."

ठाणे वाहतूक विभाग आणि स्टार प्रवाह वाहिनी "मद्यपान करून गाडी चालवू नका ", "दुचाकी

चालविताना हेल्मेटचा वापर करा" आणि "वेगमर्यादेचे पालन करा " हे सुरक्षेचे नियम पाळण्याचे

आणि ठाणे विभागात अपघात किंवा वाहतुकीची समस्या आल्यास ८२८६३००३०० आणि ८२८६४००४००

या दोन हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करीत आहे.

सतर्क रहा ! दक्ष रहा !!

No comments:

Post a Comment