Friday, August 22, 2014

Guddu Dhanoa debuts in Marathi with an explosive love story 'Gulabi'























Gulabi – An explosive love story of a Police officer and a bar dancer

Ø Sachin Khedekar to play police officer for the first time
Ø Veteran producer-director Guddu Dhanoa debuts in Marathi
Ø The film to release on 12th September

Of late, Marathi Cinema has attracted many stalwarts from Hindi film industry on the strength of its content and commercial success. Veteran producer-director Guddu Dhanoa is also all set to make his debut in Marathi with his first venture ‘Gulabi’. To be released on 12th September across Maharashtra, ‘Gulabi’ is an explosive love story of an upright police officer and a bar dancer.

Guddu Dhanoa who has to his credit many blockbusters such as Ziddi, Salakhein, Bichhoo, Aflatun and Deewana, is all geared up for his first Marathi film. ‘I have been wanting to make a film in Marathi for many years and when a subject like ‘Gulabi’ came my way, I immediately lapped it up. Fortunately I also got good star-cast and technicians on board and that made my job easy.’

Written by national award winning writer Sanjay Chauhan who is known for writing such hard hitting films as ‘Paan Singh Tomar’ & ‘Saheb, Biwi aur Gangster’ and a beautiful film like ‘I am Kalam’, ‘Gulabi’ stars Sachin Khedekar, Pakhi Hegde, Vinit Sharma and late Vinay Apte. After making her debut in an author backed role in ‘Sat na Gat’, Pakhi has again excelled in yet another powerful role.

Songs have been penned by Maya Govind and M. Prakash while music has been composed by ‘ole ole’ fame Dilip sen and Satok singh Dhalival. Cinematography has been done by Raju Keji. The film has been produced by Santosh Dhanoa, Aniket Karnik and Renuka Karnik under the banner of ‘Jai Maharashtra Films’.


पोलिस अधिकारी आणि बार डान्सरची
स्फोटक प्रेमकथा – गुलाबी

Ø सचिन खेडेकर प्रथमच पोलिस अधिका–याच्या भूमिकेत
Ø जानेमाने हिंदी निर्माते–दिग्दर्शक गुड्डू धनोआ यांचे मराठीत पदार्पण
Ø  १२ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित

हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनेक बड्या हस्तींना मराठी चित्रपटाने भुरळ घातली असून गेल्या काही काळात हिंदीतले अनेक कलाकार तसेच निर्मातेही मराठी चित्रपटांकडे वळले आहेत. जानेमाने निर्माता–दिग्दर्शक गुड्डू धनोआ हेही आपल्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज असून त्यांचा आगामी ‘गुलाबी’ हा चित्रपट एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी आणि एक बार डान्सर यांच्यातील स्फोटक प्रेमकहाणी आहे. हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी राज्यभरात प्रदर्शित होत आहे.
‘जिद्दी’, ‘सलाखें’, ‘बिच्छू’, ‘अफलातून’, ‘दीवाना’ असे एकाहून एक यशस्वी चित्रपट देणारे गुड्डू धनोआ ‘गुलाबी’द्वारे केवळ निर्माता म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक म्हणूनही मराठीत पदार्पण करत आहेत. गुड्डू धनोआ यांच्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणारे सचिन खेडेकर यांची ‘गुलाबी’मध्ये प्रमुख भूमिका असून ते आपल्या कारकीर्दीत प्रथमच एका पोलिस अधिका–याची भूमिका साकारत आहेत. त्यांना आव्हान देणा–या बार डान्सरच्या आव्हानात्मक भूमिकेत आहे पाखी हेगडे. गेल्या वर्षी मराठीत लक्षवेधी पदार्पण करणा–या पाखीने ‘गुलाबी’मधून आणखी एक सणसणीत व्यक्तिरेखा साकारली आहे. या आघाडीच्या कलाकारांना ‘सिंघम’फेम विनीत शर्मा आणि स्व. विनय आपटे यांनीही तोलामोलाची साथ दिली आहे.
‘पानसिंग तोमर’, ‘साहब, बिवी और गँगस्टर’ आणि ‘आय अॅम कलाम’ यांसारख्या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक संजय चौहान यांच्या लेखणीतून ‘गुलाबी’ उतरला आहे. माया गोविंद आणि एम. प्रकाश यांच्या गाण्यांना दिलीप सेन–समीर सेन या लोकप्रिय संगीतकार जोडीतील दिलीप सेन आणि सतोकसिंह धालिवाल यांचे संगीत लाभले असून राजू केजी यांचे छायालेखन आहे. जय महाराष्ट्र फिल्म्स या बॅनर अंतर्गत संतोष धनोआ, अनिकेत कर्णिक आणि रेणुका कर्णिक यांनी ‘गुलाबी’ची निर्मिती केली आहे.
 

No comments:

Post a Comment