Monday, June 9, 2014

RAKHI SAWANT : TIKHEE MIRCHI OF BOLLYWOOD IS NOW MARATHI FILM PRODUCER





राखीसावंत मराठीचित्रपटनिर्मितीत


'बोल्ड अँड बिनधास्त' इमेजने नेहमीच लक्ष वेधणारी राखी सावंत 'जयजयकार' या मराठी सिनेमाद्वारे चित्रपट निर्माती म्हणून प्रेक्षकांसमोर आली आहे. शंतनू रोडे दिग्दर्शित जयजयकार या मराठी सिनेमाच्या निर्मितीच्या योगदानात तिचा महत्वाचा सहभाग आहे. निर्माते राहुल कपूर, शंतनू रोडे, चंद्रशेखर नन्नावरे यांच्यासह तिने 'फेथ इनकॉर्पोरेट मुव्हीज प्रा. लि.' प्रस्तुत, 'शून्य क्रिएशन्स' निर्मित 'जयजयकार' सिनेमाची निर्मिती केली आहे. प्रदर्शनापूर्वीच अनेक महोत्त्सवांमध्ये ठसा उमटविलेल्या ‘जयजयकार’ चित्रपटाच्या माध्यमातून राखी यांनी निर्मितीत व लेखक शंतनू रोडे यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलंय.
एखाद्या माणसाने जर मनाशी पक्के ठरवले, तर तो आयुष्यात कुठल्याही समस्येवर मात करून यशस्वी होऊ शकतो. हा या चित्रपटाचा मध्यवर्ती विचार असून तो मांडलाय तृतीयपंथीयांची एक टोळी आणि एक अवलिया मेजर यांच्यातील जुगलबंदीमधून. दिलीप प्रभावळकरांनी साकारलेला मेजर अखंड आणि तृतीयपंथीयांच्या भूमिकेत संजय कुलकर्णी, भूषण बोरगांवकर, धवल पोकळे, आकाश शिंदे या यांनी धमाल उडवून दिली आहे. सामाजिक संदेश देणाऱ्या जयजयकार मधील हे तृतीयपंथी रडणारे, सतत दु:खी असणारे नाहीत; तर हसणारे, धमाल करणारे, प्रगतीचे स्वप्न बघणारे तुम्हा-आम्हा सारखे सामान्य लोक आहेत. सध्या सुरु असणाऱ्या निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये लेखक- दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्या या सिनेमाची दखल घेण्यात आली आहे हे विशेष. दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचा उत्साह या सिनेमातही तरुणांना लाजवेल असा आहे. राखी सावंत यांची निर्माती म्हणून नवी इनिंग लक्षवेधी ठरणार आहे.
चित्रपटाची वेगळ्या धाटणीची कथा शंतनू रोडे यांनी लिहिली असून दिलीप प्रभावळकर, संजय कुलकर्णी, भूषण बोरगांवकर, धवल पोकळे, आकाश शिंदे यांच्यासह सुहिता थत्तेंचीही महत्वाची भूमिका आहे. जयजयकार मधील गीते अभिजीत जोशी यांनी लिहिली असून त्यांनीच संगीतबद्ध केली आहेत, तर सोनाली पटेल यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत. छायांकन - आशुतोष आपटे, कला दिग्दर्शन- संजीव राणे, वेशभूषा - संजीव राजसिंह, रंगभूषा - निशिकांत उजवणे, संकलन - अनिल थोरात अशी श्रेयनामावली आहे. १३ जूनला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत असलेला राखी सावंत निर्मित ‘जयजयकार’ चित्रपट प्रेक्षकांना अंतर्मुख करेल हे निश्चित! 
RAKHI SAWANT : TIKHEE MIRCHI OF BOLLYWOOD IS NOW MARATHI FILM PRODUCER
   The tikhee mirchi of Bollywood Rakhi Sawant is always in spotlight , performing bold and Bindhast girl, a magnetic personality on screen to attract her fans is now as a producer of Marathi Movie ‘JAYJAYKAR’ already conquering many film festivals.
Presented by ‘Faith Incorporate Movies Pvt. Ltd.’ and produced by ‘Shunya Creations’, ‘JAYJAYKAR’ is ready to release on 13th June. Writer Shantanu Rode is entering in the direction field through this film.

The determination leads a man to solve any problem is the main topic and a social clashes between a gang of eunuchs and a striking dynamic Major gen. Dilip Prabhawalkar is an idol to the new comers has proved his capability in the role of this fanatic Major, and the gang of eunuchs is played by Sanjay Kulkarni , Bhushan Borgaonkar, Dhaval Pokle and Aakash Shinde. These eunuchs unusual are overpowered, optimistic, witty, leaving life in fun ‘n’ frolic and aiming life towards developments as a common man. Suhita Thatte is in a lead role. Lyrics and music by Abhijeet Joshi and sung by Sonali Patel. Photographed by Ashutosh Apte and directed by Sanjeev Rane. Costumes designed by Sanjeev Raj Singh , art direction by Nishikant Ujwane and editing by Anil Thorat. Rakhi Sawant is an attractive new inning of this film.
 
‘JAYJAYKAR’ is already in limelight’s in different international film festivals gaining awards in acting and direction in different cities at Kolhapur, Sangli, Jaipur, Nashik, Aurangabad, Delhi, Pune and Mumbai. Produced by Rakhi Sawant ‘JAYJAYKAR’ is releasing on 13th June, definitely emphasizing the viewers to think over the subject.

No comments:

Post a Comment